कामोठेत वसाहतीत अवजड वाहनांची वर्दळ

 


कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
पनवेल /प्रतिनिधी: – कामोठे वसाहती अवजड वाहनांना बंदी आहे. असे असताना नियम तोडून अशा प्रकारच्या वाहनांची वर्दळ वसाहतीत होत आहे. विशेष करून कंटेनर सर्वाधिक येथे उभे केले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
कळंबोली, खारघर, नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी चा समावेश आहे. येथे नागरी वसाहती असल्याने ट्रक, कंटेनर, टँकर अशा प्रकारची जड वाहनांना मज्जा आहे. तरीसुद्धा सर्रासपणे अशा प्रकारची वाहने सर्व नोडमध्ये येतात. कळंबोलीला तर वाहन पार्किंग स्वरूप आले आहे. आता हे लोन कामोठे वसाहतीत पसरले आहे. येथे वाहतूकदार मोठ्या संख्येने राहतात. तसेच त्यांचे कार्यालय सुद्धा आहेत. त्यामुळे अनेक वाहने वसाहतीमध्ये येतात. सोमवारी भरदिवसा बारा वाजण्याच्या सुमारास सेक्टर10 आणि11 च्या चौकात महाकाय ट्रेलर टर्न घेण्याकरीता आला. विशेष म्हणजे बाजूला सुषमा पाटील विद्यालय आहे. त्या गेटवरच हा ट्रेलर उभ राहिला. टर्नसाठी त्याला रस्ताही पुरेना काही काळ कंटेनर असलेल्या या ट्रेलर ने एक प्रकारे रस्ता रोको केला होता. कसा बसा हा ट्रेलर बाजूला करण्यात आला. त्यावेळी शाळा सुटल्याने रस्त्यावर विद्यार्थी व पालकांची वर्दळ होते. दरम्यान यामुळे एखादा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. असे असताना वर्दळीच्या ठिकाणी असे ट्रेलर, कंटेनर आणि ट्रक येत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या उषा डुकरे- घुले यांनी सांगितले. अशाप्रकारे अवजड वाहने वसाहतीत येताच कामा नये. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी डुकरे -घुले यांनी केली आहे.