पाणी गळतीही थांबली अन  डांबरीकरणही झाले

 

 

ओएनजीसी गेटलगत महामार्गावरील वाहतुक कोंडी फुटली

पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश

पनवेल/प्रतिनिधी-  मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर ओएनजीसीलगत रेल्वे पुलाखाली मोठया प्रमाणात खड्डे पडले होते. तसेच येथे महाराष्ट्र जीवन  प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली होती. याबाबत पनवेल  संघर्ष समितीने आवाज उठवला होता. त्यानुसार त्वरीत पाण्याची गळती थांबविण्यात आली. आणि रस्ते विकास महामंडळाने त्या  परिसरात डागडुजी केली. त्यामुळे आता येथे वाहतुक कोंडी फुटली आहे. तसेच वाहनचालकांची गैरसोय दुर झाली आहे.

मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर ओनएनजीसी परिसरात रस्त्यावर खड्डे पडले होते. विशेष करून रेल्वेच्या पुलाखाली पावसाचे पाणी साचल्याने महामार्ग खड्डयात गेला होता. त्यामुळे येथे दोनही बाजुने जाणारे वाहने हेलकावे खात होते. तसेच वाहनांचा वेग मंदावत असल्याने वाहतुक कोंडी सामोरे जावे लागत होते. पुढे नदीवर पुलाचे काम सुरू असल्याने कोंडी आनखीच भर पडत होती. पाऊस बंद झाल्यानंतर येथून जाणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली. त्यातून पाणी दोनही मार्गींकांवर वाहत असल्याने रस्त्याची आनखीनच दुर्दशा झाली. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. आणि वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत होते. येथे वाहतुक नियमन करता करता वाहतुक पोलीसांचाही दमछाक होत होता. या पार्श्वभूमीवर पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी  दोनही विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. याबाबत बैठका घेवून वस्तुस्थिती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार त्वरीत सुत्र हलली आणि सर्वात आगोदर शटडाऊन घेवून एमजेपीने येथील जलवाहिनी दुरूस्थ केली. त्यानंतर रस्ते विकास महामंडळाने या भागात नव्याने डांबरीकरण केले. त्यामुळे गेली काही महिन्यापासून निर्माण झालेला हा प्रश्न सुटला.