महापालिकेत पत्रकार कक्षाकरीता  सात लाख

 

 

 

जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मंजुर  

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश

पनवेल/प्रतिनिधी- पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने पत्रकार कक्षाकरीता पनवेल महानगरपालिका आयुक्त, महापौर, गटनेते आणि विरोधी पक्षनेते यांना निवेदन दिले होते. या मागणीची  दखल घेत पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार पत्रकार कक्षासाठी ७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  तशी माहिती  म्हात्रे यांनी पनवेलमधील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या वार्तालाप कार्यक्रमात पत्रकार संघर्ष समितीला दिले.

प्रीतम म्हात्रे यांच्याकडेही पत्रकारांनी हे निवेदन दिल्यानंतर प्रीतम म्हात्रे यांनी कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या सहकार्याने   जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठपुरावा केला.    पनवेल महानगरपालिका इमारतीमध्ये पत्रकार कक्ष ही पत्रकारांच्या हक्काची गोष्ट पनवेलच्या इतिहासात नगरपरिषद असताना तत्कालीन नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी पत्रकारांना पत्रकार कक्ष उपलब्ध करून दिला होता. मात्र बाजूलाच ग्रामीण रुग्णालयाचे शवविच्छेदन खोली असल्यामुळे याठिकाणी दुर्गंधी येत होती. त्यामुळे  तो कक्ष काही वर्षांमध्ये बंद झाला. त्या वेळा पासून पत्रकारांनी नगरपालिकेमध्ये इतर भागात पत्रकारांसाठी जागेची मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या माध्यमातून घेण्यात आला. अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ पत्रकार माधव पाटील, सुनील पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, महापौर डॉ.कविता चौतमल आणि विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना भेटून निवेदन देण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पत्रकारांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव पाठविला त्यानुसार पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या केलेल्या पाठपुराव्याला यश मिळून जिल्हा नियोजन मंडळाकडून तब्बल 7 लाखांचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले असल्यामुळे पत्रकारांसाठी एक सुसज्ज कक्ष बनविण्यासाठीचा मार्ग सुकर झाला आहे. 

यावेळी अध्यक्ष निलेश सोनावणे, सरचिटणीस मंदार दोंदे, कार्याध्यक्ष संजय कदम, प्रसिद्धी प्रमुख राज भंडारी, साहिल रेळेकर, जेष्ठ पत्रकार तथा समितीचे सल्लागार माधव पाटील, सुनील पोतदार, सय्यद अकबर, सदस्य विवेक पाटील, अनिल भोळे, अनिल कुरघोडे, विशाल सावंत, रवींद्र गायकवाड, प्रवीण मोहोकर, संतोष भगत, राजेश डांगळे, चंद्रशेखर भोपी, लक्ष्मण ठाकूर, भारतकुमार कांबळे, वचन गायकवाड, यांच्यासह प्रीतम म्हात्रे यांचे स्वीय सहाय्यक रोहन गावंड आदी उपस्थित होते.