राजकीय खेळ संपल्यानंतर हे दोन आमदार खेळण्याच्या दुकानात

 

 

 


डॉ विश्वजीत कदम आणि रोहित पवार गेले एकच गाडीत
मुंबई /प्रतिनिधीगेले दहा बारा दिवस राज्यात अनेक घडामोडी घडत होत्या. अनेक राजकीय पेचप्रसंग तयार झाले पण शेवटी महाविकास आघाडी झाली. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मिळाले. शनिवारी बहुमताने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, रविवारी अधिवेशन देखील पार पडले. विधानसभेचा सदस्य या नात्याने वेगवेगळ्या पक्षांचे आमदार आ सर्वजण या घडामोडीं आणि राजकीय बाबाच्या खेळाचे भाग होतो. युवा आमदारांना खूप मोठा अनुभव देणारा हा काळ होता. हे सर्व संपल्यानंतर डॉ विश्वजीत कदम आणि रोहित पवार खेळण्याच्या दुकानात गेले आणि येथे आपल्या मुलांना खेळणे खरेदी केली.

कालच्या अधिवेशनाचे कामकाज संपवून याच घडामोडींवर चर्चा करत हे दोघेही एकाच गाडीने एकत्र निघाले, साहजिकच गप्पा राजकीय रंगल्या होत्या पण अचानक रस्त्याच्या बाजूला एक खेळण्याचं दुकान दिसल्याबरोबर दोघांनाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरला नाही. कारण मुंबईत या सर्व गोष्टी घडत आहेत, आमदार म्हणून यात भाग घेऊन ते त्यांचं कर्तव्य पार पाडत आहोत, पण याकाळात आपल्या घराची विशेषतः आपल्या मुलांची आठवण देखील येत असते. राजकारणात काम करणे म्हणजे एका मोठ्या कुटुंबात वावरल्याचा अनुभव असतो, आपला मतदारसंघच आपलं कुटुंब बनत आणि त्यांच्यासाठी आम्ही आनंदाने काम देखील केले जाते. परंतु कधी कधी या जबाबदारीत घराकडे थोडं दुर्लक्ष होत, एक बाप म्हणून जेवढा वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे तेवढा देऊ शकत नाही त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या प्रसंगातून नेहमीच आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. असं भावनिक मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

आता घरी पोहचल्यानंतर मला भेटल्यानंतर आणि त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो माझ्यासाठी खूप समाधानकारक असेल. असेही त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.