प्रत्येक सूचनेचे राज्य सरकार स्वागत करेल

 

 


युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ग्वाही
ऍड श्रीनिवास क्षिरसागर यांनी कळंबोलीत केले स्वागत
पनवेल /प्रतिनिधी:- सरकार प्रत्येक सूचनेचे स्वागत करून त्या दृष्टिकोनातून कामसुद्धा करेल अशी ग्वाही युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. मंगळवारी सायंकाळी कळंबोली मॅकडोनाल्ड येथे सेनेचे उदगीर संपर्कप्रमुख तथा पनवेल महानगर संघटक ऍड श्रीनिवास क्षिरसागर यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात सत्ताकारणाच्या नाट्यमय घडामोडी घडत होत्या. मात्र त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकून या राज्याला एक प्रकार ते स्थिर सरकार दिले आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा बिनविरोध पार पडली आहे. दरम्यान दोन-तीन दिवसातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रशासकीय कामाची चुणूक दाखवली. त्यांच्या सभागृहातील भाषणाने संपूर्ण महाराष्ट्राला प्रभावित केले. या सर्व पार्श्वभूमीवर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे व्यस्त होते. मंगळवारी सायंकाळी ते पुण्याकडून मुंबईला जात असताना कळंबोली येथे काही वेळ थांबले होते. दरम्यान ऍड श्रीनिवास क्षिरसागर यांनी मॅकडोनाल्डला ठाकरे यांचे स्वागत केले. आणि महाविकास आघाडीच्या सरकारला शुभेच्छा दिल्या. यादरम्यान ऍड क्षिरसागर यांनी उदगीर आणि पनवेल परिसरातील विविध प्रश्नांविषयी युवासेना प्रमुख यांना माहिती दिली. विशेष करून पनवेल परिसरातील पाणी टंचाईबाबत त्यांनी साकडे घातले. आपले शासन हे कामाला लागले आहे. यापुढे लोकहिताचे काम नक्कीच मार्गी लागतील. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील समस्यांची सोडवणूक करण्यास शासन अग्रक्रम देईल असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. आपल्या सूचनाचे शासन स्वागत करील असेही ते म्हणाले. यावेळी आमदार योगेश रामदास कदम उपस्थित होते.