खांदेश्वर  रेल्वेस्थानकावर फ्री रेल वायफाय सेवा

 

 

 

मानसरोवरही लवकरच सेवा कार्यन्वित करणार

कामोठे शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

पनवेल/प्रतिनिधी-  भारतीय रेल्वेने इतर रेल्वेस्थानकावर वायफाय सेवा सुरू केली असली तरी खांदेश्वर आणि मानसरोवर या ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली नव्हती. शिवसेनेचे उपशहर प्रमुख लकीत सोडेवाले यांनी रेल्वेकडे पाठपुराव्या केल्याने बुधवारी  खांदेश्वर रेल्वेस्थानकावर मोफत रेल वायफाय सेवा सुरू करण्यात आली. मानसरोवर रेल्वेस्थानकावर लवकरच कार्यन्वित करण्यात येणार आहे.

सदया इंटरनेटचा जमाना असून त्यामुळे जग अधिक जवळ आले आहे. तसेच सोशल मिडिया सुध्दा अधिक प्रभावी झालेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रेल्वेने सर्व स्थानकावर मोफत वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई उपनगरीय रेल्वेस्थानक अनेक रेल्वेस्थानकावर ही सेवा देण्यात आली. मात्र  पनवेल जवळील खांदेश्वर मानसरोवर वायफाय बसविण्यात आला नव्हता. सर्वत्र इंटरनेट  सुरू असताना हीच  रेल्वेस्थानक उपेक्षीत का असा सवाल करीत  शिवसेनेचे कामोठे उपशहर प्रमुख लकित सोडेवाले आणि उपविभागप्रमुख  देवानंद पाचपुते यांनी रेल्वेकडे पाठपुरावा केला. त्यांना इतर पदाधिकाऱ्यांचे पाठबळ मिळाले. त्या अशायाचे निवेदन सुध्दा देण्यात आले होते. त्याची दखल घेत बुधवारी खांदेश्वर रेल्वेस्थानकावर

ज्येष्ठ नागरिक रामचंद्र काशिनाथ पवार यांच्या हस्ते फ्री रेल  वायफाय सेवा लोकार्पन करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका संघटक भरत पाटील, ज्येष्ठ नागरिक रघुनाथ  डोईफोडे, रघुनाथ पवार ,सदानंद साळुंखे , रेवती शिवसेना पनवेल विधानसभा संघटिका रेवती सकपाळ, महानगर संघटिका अॅड. शुभांगी शेलार उपमहानगर प्रमुख  प्रभाकर गोवारी उपशहरप्रमुख  नागसेन मोरे . संजय ननावरे ,देवानंद पाचपुते सविता सोडेवाले . राहूल बुधे ,गणेश खांडगे ,हुसैन मोमीन .मेघना संजय ननावरे तसेच  स्थानक प्रबंधक एस.एन मोरे उपस्थित होते.