खारघरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी गजाआड

 

 


गुन्हे शाखेच्या कक्ष 3 ने सापळा रचून केले जेरबंद

पनवेल /प्रतिनिधी: – खारघर येथील एका खाजगी क्लासमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक तीनच्या पथकाने सापळा रचून अटक केले. विशेष म्हणजे त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून या आरोपीला जेरबंद केले.

डी डी जैन वय २९ असे या आरोपीचे नाव आहे. खारघर सेक्टर ११ येथील एका खाजगी क्लासेसमध्ये तो शिकवणी घेत असे. त्याने एका १८ वर्षे ४ महिने वयाच्या मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याची तक्रार 15 ऑक्टोबर 2019 रोजी खारघर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी भा द वि ३७६ , २७७ , ३४२ . ५०९ ५०६ . ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. दरम्यानच्या काळात आरोपीचा उच्च न्यायालयातही अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्याने तो फरार झाला. हा गुन्हा संवेदनशील असल्यान नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रविणकुमार पाटील यांनी कक्ष – ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने व त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक तपासकामी नेमले. गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या संबंधितांना दिल्या . त्याप्रमाणे पाहिजे आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला. चार डिसेंबर रोजी २०१९ रोजी जैन हा नेरुळ , एल . पी . ब्रिज परिसरात त्याच्या मित्रास भेटण्यासाठी येणार असल्याबाबतची गुप्त माहिती बातमीदारामार्फत मिळाली. सदर बातमीची खात्री करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून पोलीस पथक सापळा लावून थांबले होते . सुमारे साडेआठ वाजता आरोपी हा पायी चालत या ठिकाणी आला. तो एका व्यक्तीबरोबर बोलत असतांना दिसुन आला. दरम्यान तो गुन्हयातील पाहिजे आरोपी डी . डी . जैन असल्याबाबत खात्री झाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक त्याच्या जवळ जात असतांना , तो पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास पथकाने लागलीच पाठलाग करून ताब्यात घेतले . त्याचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करून अटक करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासात पोलीस आयुक्त . संजय कुमार , सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर , पोलीस उपायुक्त प्रविणकुमार पाटील , सहाय्यक आयुक्त अजय कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील तपास गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक , सुनिता भोर करीत आहेत. कक्ष क्रमांक 3 च्या पथकाने केलेल्या कामगिरीचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.