मोटारसायकल चोरीचे डझनभर गुन्हे उघडकीस

 

 

 

पनवेल शहर पोलिसांची धडक कामगिरी
सात आरोपींपैकी चार अल्पवयीन
पनवेल/ प्रतिनिधी:- मोटरसायकल चोरीच्या डझनभर गुन्ह्यांची पनवेल शहर पोलिसांनी उकल केली आहे. तसेच डीकी उघडुन त्यातील वस्तूंच्या चोरीचे प्रकारही उघडकीस आले. याप्रकरणी सात आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. त्यापैकी चार जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी कर्जत येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी जवळपास सव्वातीन लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

पनवेल शहर पोलीस ठाणे हददीतुन स्कुटी , अॅक्टीवा , युनिकॉर्न , केटीएम , बजाज बॉक्सर , अॅक्सेस इ . मोटार सायकल व स्कुटी चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच स्कुटीच्या डिक्कीचे लॉक ड्युप्लीकेट चावीने खोलुन चोरी केले बाबत गुन्हे दाखल होते . सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नवी मुंबई चे पोलीस आयुक्त संजय कुमार , सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर व परिमंडळ दोनचे पोलीस उप आयुक्त अशोक दुधे यांनी विशेष प्रयत्न करण्याबाबत सुचना दिल्या होत्या . या गुन्हयाच्या प्रगटीकरणाच्या दृष्टिकोनातून वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिडडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कसून तपास सुरू केला. गुप्त बातमीच्या आधारे मोटारसायकल चोरीच्या गुन्हयातील दोन आरोपींना गुरुवारी अटक केली. तसेच ४ विधीसंघर्षग्रस्त बालकांकडे चौकशी केली. त्यांनी मौज – मजेसाठी एकुण १२ मोटार सायकल, स्कुटी चोरी केल्याची कबुली दिली. गाडीतील पेट्रोल संपेल तेथे वाहने बेवारस सोडुन देत असल्याची माहिती चौकशीत पुढे आली. त्यांच्याकडुन १२ वाहनापैकी ०७ वाहने हस्तगत केली करण्यात आली . व इतर ५ वाहने यापुर्वीच बेवारस स्थितीत मिळुन आले होते. त्यानुसार ती मुळ मालकांना परत करण्यात आली आहेत . या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी सुशिल सुनिल म्हस्के , ( २५ ) , रा . कोपरा गांव , सेक्टर १० खारघर संतोष राजकुमार कांबळे , रा मालधक्क्का शेड , पनवेल अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पनवेल शहर पोलीस ठाणे – १० , सानपाडा पोलीस ठाणे आणि खारघर पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या प्रत्येकी एक अशा बारा गुन्ह्यांची उकल झाली आहे . पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक , सुनिल तारमळे , विजय आयरे , रविंद्र राऊत , राजेश मोरे , अमरदिप वाघमारे , सुनिल गर्दनमारे व यादवराव घुले यांनी अतिशय शिताफीने आरोपींना अटक केली. आणि त्यांच्याकडून चोरीच्या गाड्या याकरता वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत केले.
ड्युप्लीकेट चावीने चोरी करणारा अटक
स्कुटीच्या डिक्कीतुन ड्युप्लीकेट चावीच्या सहाय्याने चोरी करणा – या सराईत आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी अटक केली . तांत्रिक तपासाचे आधारे आकुर्ली येथे ट्रॅप लावुन त्याला ताब्यात घेतले. विकास मोहन धोत्रे , (३७ )वर्षे असे अटक आरोपी चे नाव आहे. त्याच्यावर यापुर्वी नाशिक , मुंबई , नवीमुंबई येथे गुन्हे दाखल आहेत . आरोपी कडून ६१ . २००- रुपये किमतीची १ अॅक्टीवा स्कुटी , ०२ समसंग व ०२ ओपो कंपनची मोबाईल फोन , १ हेल्मेट व ०४ ड्युप्लीकेट चाव्या हस्तगत करण्यात आल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक ईशान खरोटे , पो दिलीप चौधरी पंकज पवार , दिनेश जोशी , राहुल सांळुखे , अजय कदम , राजु खेडकर यांनी या प्रकरणाचा छडा लावला .

जनावारांचा मांस वाहतुक करणारा गजाआड

तसेच पनवेल शहर पोलीस ठाणे कडील मोटार अपघाताचे गुन्हयात आरोपीत नाजीम अब्दुल रज्जाक बेवारी( ३६ )वर्षे , धंदा नोकरी , इंदापुर , जि पुणे याने त्याच्या स्कोडा गाडीचा अपघात केला. सदरची गाडी घटनास्थळावर सोडुन पळुन गेला होता . या गाडीमध्ये जनावराचे मांस मिळुन आले होते . पोलीस उप निरीक्षक विश्वासराव बाबर , संदीप फाळके यांनी त्यास वालचंदनगर , जि . पुणे येथुन ताब्यात घेवुन सदर गुन्हयात अटक केली आहे . सदर आरोपीत हा सराईत असुन त्याचेवर जुन्नर पोलीस स्टेशन , पुणे ग्रामीण येथे ३ गुन्हे दाखल आहेत .

“नागरीकांनी आपली वाहने सुरक्षित पार्कीगमध्ये पार्क करावी . वाहनांना चोरी प्रतिबंधक होणेसाठी हॅण्डल लॉक सायरन , जी . पी . एस सिस्टीम यंत्रणा बसवुन घेण्यात यावी. जेणेकरून वाहन चोरीच्या घटनांना आळा बसेल “
अजय कुमार लांडगे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर