परेश ठाकूर यांना डॉक्टरेट

केईआयएसई युनिर्व्हसिटीने घेतली दखल
पनवेल/प्रतिनिधी
पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश रामशेठ ठाकूर यांच्या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय केईआयएसई इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी च्या वतीने डॉक्टरेट ही पदवी जाहीर करण्यात आली आहे. ठाकूर यांचे याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
श्रीलंकेत होणार्‍या पदवीदान समारंभात ही पदवी त्यांना बहाल केली जाणार आहे. परेश ठाकूर यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्यांनी विविध सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांचे महत्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. ते विविध उपक्रमांमध्ये सहभागी होवून संबंधित संस्था आणि व्यक्तींना प्रोत्साहन देतात. अनेकांना मदतीची हात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिला आहे. पनवेल महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. परेश ठाकूर हे सभागृह नेते असून त्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठवत असतात. घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक निर्मुलन त्याचबरोबर प्रक्रिया झालेल्या सांडपाण्याचा पुर्नवापर या पर्यावरण विषयक विषयांवर त्यांनी आग्रही भूमिका घेतली. त्याचबरोबर या करीता पुढाकारही घेतला. या अनेक कामांची दखल केईआयएसई या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने घेतली. त्यांनी परेश ठाकूर यांची प्रोफाईल पाहून त्यांनी डॉक्टरेट पदवी देण्याचा निर्णय घेतला.