डाॅ.कविता चौतमोल पुन्हा पनवेलच्या प्रथम नागरिक

 

 

 

पनवेलमध्ये भाजपाच्या विजयाचा डबल धमाक
पोटनिवडणूक विजयानंतर महापौर आणि उपमहापौर सुद्धा कमळाचेच
पनवेल/ प्रतिनिधी:- शुक्रवारी पनवेल महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या रुचिता गुरुनाथ लोंढे यांनी दणदणीत विजय संपादन केला. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी डॉ. कविता चौतमोल यांची फेरनिवड करण्यात आली. तर जगदीश गायकवाड हे उपमहापौरपद झाले. कमळाच्या विजयाचा डबल धमाका कार्यकर्त्यांना अनुभवता आला.
पक्षीय बळाबल पाहता भाजप उमेदवारांचे पारडे अधिक जड होते, त्यामुळे फक्त निकालाची औपचारिकता शिल्लक होती. शुक्रवारी ४९ विरुद्ध २७ असे मतदान झाले .  त्यानुसार पुन्हा एकदा महापौरपदी डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौर जगदिश गायकवाड यांची वर्णी लागली.
माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत , शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर,जेष्ठ नगरसेविका सिताताई पाटील,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी घोषणा, ढोलताशा व फटाक्यांच्यागजरात जल्लोष साजरा करण्यात आला. त्यामुळे पनवेलमध्ये सर्वत्र जल्लोषमय वातावरण पहायला मिळाला.