कळंबोलीत संत भगवानबाबा चौकाचे नामकरण

 

 


डॉ. हरी महाराज पालवे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण
पनवेल /प्रतिनिधी :येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कलंबोली येथील ज्ञानदीप शाळेसमोरील चौकाला श्री संत भगवान बाबा यांचे नाव देण्यात आले. ह. भ. प डॉ. हरी महाराज पालवे यांच्या हस्ते शनिवारी या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यानिमित्ताने किर्तन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते.
श्री संत भगवान बाबांनी प्रबोधनातून वंजारी समाजाला खऱ्या अर्थाने दिशा दिली. यांच्यामध्ये जनजागृती करून मोठ्या प्रमाणात बदल घडून आणला. त्यामुळे आज समाज प्रगतिपथावर आहे. भगवान बाबांचे सात्विक विचार तसेच त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारून आज प्रत्येक क्षेत्रात समाजाने झेप घेतली आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाल्याने आज कित्येक जण उच्च पदावर कार्यरत आहेत. भगवानगड हे समाजाचे अधिष्ठान मानले जाते. दरम्यान श्री संत भगवान बाबा आणि वामन भाऊ यांची पुण्यतिथी राज्यभर साजरी केली जाते. कळंबोली तही शनिवारी पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने ज्ञानदीप शाळेसमोरील चौकाचे श्री संत भगवान बाबा चौक असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी ह . भ . प डॉ. पालवे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.