संत वामन भाऊ व भगवान बाबा पुण्यतिथी सोहळ्याची सांगता

 

 

 

आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन दर्शन घेतले
पनवेल/ प्रतिनिधी: – खांदा वसाहतीत भजन, किर्तन, हरिपाठ त्याचबरोबर विठू नामाचा जागर दिली पाच दिवस सुरू होता. याकरीता मोठ्या प्रमाणात भाविक आणि वारकऱ्यांचा मेळा जमला होता. निमित्त होते संत वामन भाऊ व भगवान बाबा पुण्यतिथी चे. शनिवारी या कार्यक्रमाची सांगता झाली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी या हरिनाम सप्ताह ला भेट देत सुश्राव्य कीर्तन श्रवण केले. त्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या समोर सिडको भूखंडावर हा हरिनामाचा जागर पार पडला. मंगळवारी ह .भ .प महेश महाराज साळुंखे व ह .भ .प गहीनाथ खेडकर यांच्या हस्ते विणा व प्रतिमेचे पूजन करण्यात आले . ह .भ .प सुदाम महाराज पानेगावकर , बुधवारी ह .भ. प राधाबाई सानप , गुरुवारी ह भ प शालिनीताई देशमुख, शुक्रवारी ह भ प महेश महाराज साळुंखे यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही या अध्यात्मिक सोहळ्यामध्ये सहभाग घेतला . यांच्या हस्ते कीर्तनकार ह-भ-प साळुंखे यांचा शनिवारी रामदास महाराज सानप यांचे काल्याचे किर्तन होऊन हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, बाळासाहेब पाटील, प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच दिवशी सकाळी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत वामन भाऊ आणि भगवान बाबा यांच्या नामाचा जयघोष करण्यात. भाजपच्या नगरसेविका सीता ताई पाटील यांना फुगडी घेण्याचा मोह आवरला. त्याचबरोबर वारकऱ्यांनी विठुनामाच्या गजरात ठेका धरला. दरम्यान मंगळवारी आमदार नरेंद्र दराडे यांनी पुण्यतिथी सोहळ्याला भेट देऊन संत वामन भाऊ व भगवान बाबांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष हरिदास वनवे यांच्यासह उपाध्यक्ष सुनील खाडे, सचिव देविदास खेडकर, विनायक मुंडे, संजय वायभासे, दिलीप नाकाडे, दत्ता बिनवडे, शिवाजी लांब, बाळासाहेब बडे, बबन बारगजे, श्रीहरी मिसाळ यांच्यासह पदाधिकारी भाविक परिश्रम घेतले. पनवेल महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका सीताताई सदानंद पाटील यांचे विशेष सहकार्य दरवर्षाप्रमाणे यंदाही मिळाले असल्याचे खेडकर यांनी सांगितले.