खांदा वसाहतीत रंगला केपीएलचा थरार

सोळा संघ खेळले चाळीशीनंतर क्रिकेट
स्वच्छता व आरोग्य  खेळाचा संदेश  
पनवेल/प्रतिनिधी-   तरूण खेळाडूंकरीता पंचक्रोषीत विविध ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. बक्षिसांच्या भव्य रक्कमा, क्रिकेटचा थरार… या ठिकाणी पहावयास मिळतो. मात्र खांदा वसाहतीत संजय भोपी सोशल क्लब, अलर्ट सीटीझन फोरम तसेच माॅर्नींग योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीशी पूर्ण झालेल्यांकरीता  खांदेश्वर प्रिमयर लिग क्रिकेट स्पर्धेचे रविवारी  आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता व आरोग्य साठी  खेळा हा संदेश देणाऱ्या या स्पर्धेचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.  
एकदा चाळीशी ओलांडली की व्याधी जडण्यास सुरूवात होते. या काळात अधिक तंदुरूस्त राहण्याकरीता व्यायाम, योगा त्याचबरोबर खेळ खेळण अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती फिट राहतो. मात्र याबाबत जागृती नसल्याने चाळीशी पार पडलेल्या लोकांचे आरोग्य बिघड जातो. खांदा वसाहतीत संजय भोपी यांच्या नेतृत्वाखाली संजय पाटील, मोतीराम कोळी, दत्ता  कुलकर्णी , भिमराव पोवार,यांच्यासारख्या  अनेकांनी एकत्रीत येवून माॅर्निग योगा गृपची स्थापना केली. आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात   सदस्य या गृपला मिळाले आहेत. दररोज या सगळी मंडळी व्यायाम करतात. योगाबरोबर काही खेळ खेळतात. दिवसेदिवस  संख्या वाढत चालली असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले. अर्थात या गृपला संजय भोपी सोशल क्लब, अलर्ट सीटीझन फोरमचा पाठिंबा मिळत आहे. सदया क्रिकेट या खेळाला ग्लॅमर आहे. लहानांपासून मोठयांपर्यंत या खेळात विशेष रूची आहे. नोकरी धंदयाला लागल्यानंतर बहुतांशी जणांचे क्रिकेट सुटते. हा खेळ शाररिक व्यायामाकरीता फायदेशीर आहे. म्हणून चाळीशीनंतर ही केवळ आरोग्याकरीता क्रिकेट खेळला जावा या उद्देशाने खांदा वसाहतीत गेल्या  काही वर्षापासून  केपीएलला सुरूवात करण्यात आली. 2 फेब्रुवारी रोजी महात्मा स्कुलच्या मैदानावर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत खांदा वसाहतीतील नामवंत डॉक्टर्स, उद्योजक, विविध क्षेत्रातील अभियंता, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील वयाच्या चाळीशी पूर्ण झालेले खेळाडू आपली  सोसायटी तसेच इतर  संघाकडून  खेळले. खांदा कॉलनी हा संदेश सुद्धा यावेळी देण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांच्या नेतृत्वाखाली जी प्रसन्ना, भगवान विचारे, सुरेश म्हात्रे, रामदास गोवारी, संजय पाटील, अनंत पाटील, लक्ष्मण साळुंखे, सुरेश म्हात्रे, सतीश म्हात्रे यांच्यासह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.
आ. प्रशांत ठाकूरांची फलंदाजांनी गोलंदाजी
आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पर्धेचे उदघाटन केल्यानंतर हातात बॅट घेवून खेळपट्टीवर आले. त्यांनी महात्मा स्कुलच्या मैदानावर फटकेबाजी करीत रविवारची सकाळ जिंकली. क्रिकेटबरोबरच आता  इतर मैदानी खेळांची  40 प्लस स्पर्धा भरविण्याचा सल्ला संजय भोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिला. त्याचबरोबर उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. आ. ठाकूर यांनी समालोचन कक्षात बसून क्रिकेट सामने पाहण्याचा आनंद लुटला.