तात्पुरती झोपडी आगीत जळून खाक

 

 


पनवेल रेल्वे स्थानक रोडलगत ची घटना
पनवेल प्रतिनिधी – पनवेल शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रोडवर जो सर्कल आहे. तिथे सोमवारी दुपारी सव्वा एक वाजता एक तात्पुरती झोपडी जळून खाक झाली. यामध्ये कपडे वस्तू जळून गेल्या. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पनवेल महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली
पनवेल रेल्वे स्थानकासमोरील सर्कल आहे. त्याठिकाणी बेकायदेशीर एक झोपडी बांधण्यात आली होती. ती तात्पुरत्या स्वरूपाची होती. या राहुटी वजा झोपडीमध्ये सकाळी चूल पेटवण्यात आली होती. त्यामधील विस्तव तसाच असला आहे वाऱ्याने तो धुमसत गेला. त्यामुळे  सव्वा एक वाजता या झोपडीला आग लागली. आगीची तीव्रता मोठी असल्याने काही वेळातच झोपडी जळून खाक झाली. आत मध्ये कोणीच नसल्याने जीवित हानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल जाधव, फायरमन श्याम मांडवकर यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन बंब आणि जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काही मिनिटातच ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे याचा लोण बाजूला पोहोचला नाही.