पारनेरच्या शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सहा जनपथवर आदरतिथ्य

 

 


शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी साधला संवाद
आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली झाली भेट
दिल्ली/श्रीकांत चौरे
पारनेर तालुक्यातील सुमारे 500 पेक्षा जास्त शेतकरी आणि त्यांच्यासोबत इतर गुरुवारी दिल्ली येथील 6 जनपथ वर गेले. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी आदरातिथ्य केले. तसेच एक ते दीड तास सर्वांशी मनमोकळेपणे संवाद साधला. त्याचबरोबर के के रेंज आणि पारनेर तालुक्यातील पाणीप्रश्‍नावर चर्चा करण्यात आली. येत्या काही दिवसात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच पाण्याबाबत सुद्धा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून असे पवार म्हणाले.
दरवर्षीप्रमाणे यांनाही आमदार निलेश लंके 500 जना घेऊन वैष्णोदेवी यात्रेला गेले होते. त्यामुळे शेतकरी सुद्धा आहेत. सर्व यात्रेकरू दिल्ली या ठिकाणी आले आहे. त्यानिमित्ताने त्यांनी राजधानी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या सर्वांचे 6 जनपथ या बंगल्यावर मोठ्या आत्मीयतेने स्वागत करण्यात आले. सर्वांची विचारपूस शरद पवार यांनी केली. चहा अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. सर्वांबरोबर चहापान करताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
आमदार निलेश लंके हे खरोखरच लोकमतातून निवडून आलेले आमदार आहेत. दिल्ली सारख्या ठिकाणी साडेचारशे ते पाचशे लोक घेऊन फिरणारा आमदार यापुढील काळात महाराष्ट्रात एक नवीन इतिहास तयार करेल असे गौरवोद्गार शरद पवार यांनी केवळ काढले . खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी काल संसदेमध्ये कांदा प्रश्न संदर्भात केलेल्या चर्चेचा तपशील उपस्थितांना सांगितला. के.के. रेंज बाधित शेतकऱ्यांशी पवार व सुळे यांनी सविस्तर चर्चा केली .
यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे, प्रतिष्ठानचे जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र चौधरी,बापु शिर्के, विजय औटी,डॉ. कावरे,श्रीकांत चौरे,सरपंच राहुल झावरे,गणेश साठे,अरूण पवार,सचिन पठारे किशोर गाडे,श्रीकांत पवार बापू रोहकले संदीप सालके,दत्ता कोरडे,संतोष ढवळे,बलभीम कुबडे,सुरज भुजबळ, संभाजी आढाव, पोपट पिसाळ, शरद चौधरी, जयसिंग जरड ,संभाजी जरड, विनायक जरड, संदीप वाघ ,शरद वाघ ,विश्वनाथ वाघ, संदीप चौधरी,संदिप रोहकले,अंकुश मस्के,रमेश रोहकले,नवनाथ रासकर,प्रितेश पानमंद,राजेंद्र खोसे, सुभाष कावरे, अमोल दळवी, रामदास साळवे, टायगर शेख,ह.भ.प. शिवाजी महाराज रेपाळे,नामदेव कावरे,बबन व्यवहारे, सत्यम निमसे, निलेश शिंदे,प्रमोद गोडसे,किरण गव्हाणे,पवन खामकर प्रमोद साठे, नंदु सोंडकर,दत्ता निवडूंगे,सोपान मते भाऊ ठूबे,तान्हाजी आचार्य,सागर मते, पप्पु कावरे, प्राविण थोरात , स्वप्निल कावरे सह पारनेर नगर तालुक्यातील अनेक पं.समीती सदस्य, सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सेवा सोसायटीचे चेअरमन यांच्या सह अनेक तरुण,पदाधिकारी या वेळी सहभागी झाले.