50 वर्षीय महिलेला शेजाऱ्याने जाळून दिली फाशी?

 

मृत महिलेच्या कुटुंबियाचा गंभीर आरोप 

मंगळसुञ चोरी केल्याच्या संशायावरून वाद

पनवेल तालुक्यातील दुंदरे गावातील दुर्घटना
पाच आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पनवेल/प्रतिनिधी- हिंगणघाटातील महिलेवर अॅसिड हल्याची घटनेने संपुर्ण महाराष्ट्रात चिड निर्माण झाली आहे. त्या घटनेचा निषेध ठिकठिकाणी नोंदवला जात आहे. त्यातच  पनवेल तालुक्यातील दुंदरे गावात एका महिलेला पेटवून देऊन फाशी दिल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. परंतु आरोपी फरार असल्याची माहिती पुढे आली आहे. संबधीत महिलेने आत्महत्या केली की तिची  हत्या करण्यात आली. याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.  
शारदा गोविंद माळी (50)  असे मृत महिलेचे नाव असल्याचे समजते.  ती दुंदरे या गावात राहत होती.तीचे  शेजारच्या  घरातील  एका महिलेने मंगळसुत्र चोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून मोठा वादही झाला होता. त्यावरून त्या महिलेच्या घरात जावून पेटवले असल्याचा आरोप माळी कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी अलका गोपाळ माळी, वनाबाई अर्जुन दवणे, गोपाळ विठ्ठल पाटील, हनुमान पाटील यांच्यावर आत्महत्यास प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीसांनी त्यांना अध्याप अटक केली नसून त्याचा शोध सुरू आहे.   

मृत महिलेच्या कुटुंबियांना  धमकी
मृत शारदा गोविंद माळी या महिलेच्या कुटुंबियांना आरोपी धमकी देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.आरोपी धमकी देत असताना पोलीसांना त्यांना पकडीत नाहीत असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
 चित्रा वाघ यांनी घेतली भेट
भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पनवेल येथे येवून मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी त्यांचे सांत्वन करून आरोपींना कडक सजा मिळावी यासाठी पोलीसांकडे मागणी करणार असल्याचे सांगितले. भारतीय जनता पक्ष माळी  कुटुंबियांच्या पुर्णपणे पाठिशी असल्याची ग्वाही वाघ यांनी दिली. त्याचबरोबर तालुका पोलीस ठाण्यात जावून आरोपींना अटक करण्याची मागणी 
चौकट
सहपोलीस आयुक्तांनी घेतला आढावा

याप्रकरणाची नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार सह पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यामुळे लवकरच आरोपींना अटक होण्याची चिन्ह दिसू लागले आहेत.