महिलेला जाळून फाशी दिलेले आरोपी गजाआड

 


पनवेल तालुका पोलिसांनी मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
पनवेल /प्रतिनिधी:- मंगळसूत्र चोरी प्रकरणातून झालेल्या वादात पनवेल तालुक्यातील दुंदरे येथे एका महिलेला जाळून फाशी दिल्याची चीड निर्माण करणारी घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपींना शुक्रवारी पहाटे पोलिसांनी गजाआड केले. या घटनेचा सखोल तपास पोलिस करीत आहेत.
शारदा गोविंद माळी (50)  असे मृत महिलेचे नाव असल्याचे आहे . तिचे मंगळसुत्र चोरी झाले होते. यावरून शेजारच्या घरातील महिलेवर संशय होता. त्यामुळे मोठा वादही झाला होता. घरात कोणी नसल्याचे पाहून शारदा माळी यांना शेजारच्यांनी पेटवले त्यानंतर फाशी दिली असल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केले. सुरुवातीला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या प्रकरणी आवाज उठवला. त्यानंतर तालुका पोलिसांनी आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सकाळी दुंदरे गावातील डोंगर भागातील एका घरामध्ये लपून बसलेल्या
हनुमान भगवान पाटील (-37),गोपीनाथ विठ्ठल( 45) ,अलका गोपीनाथ पाटील(35)
वनाबाई अर्जुन दवणे (65 ) यांना अटक करण्यात आले. आरोपींना पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.