सत्तावीस वर्षांच्या सहजीवनाला शुभेच्छा

 


कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो. ती त्याला प्रत्येक आघाड्यावर साथ आणि पाठिंबा देत असते. त्याचप्रमाणे एखाद्या कर्तुत्ववान रणरागिणीला यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी तिचा जीवन साथी खंबीर साथ देत असतो. पुरुषांची मक्तेदारी मोडण्याचे काम जेव्हा एखादी हिरकणी करते तेव्हा तिला पतीची खंबीर साथ मिळते. पनवेल महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका सिताताई पाटील यापैकीच एक होय. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सीताताईंनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.24 तास 365 दिवस जनतेची सेवा करणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. नगरसेविका पदाची हॅड्रिक साधणाऱ्या पाटील कार्यक्षम, कार्यतत्पर आणि जनतेशी प्रामाणिक एकनिष्ठ राहणाऱ्या नगरसेविका आहेत. कमालीची लोकप्रियता, तसेच दांडगा जनसंपर्क, संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सीताताई पाटील यांच्या पाठीमागे त्यांचे पती सदानंद पाटील यांची खंबीर साथ आहे.
कष्ट, मेहनत, जिद्द आणि चिकाटीचे दुसरे नाव म्हणजे सीताताई व सदानंद पाटील हे दाम्पत्य होय. सत्तावीस वर्षांपूर्वी या दोघांनी सह जीवनाचा आणाभाका घेतला. आणि संसाराचा गाडा प्रतिकूल आणि खडतर मार्गावर चालवला. अनेकदा काटेरी वाटेवर चालत असताना या पती-पत्नीचे पाय रक्ताळले सुद्धा. परंतु त्यावरून चालणे या दोघांनी सोडले नाही. अनेक संकट तर आव्हानांना त्यांनी परतावून लावले. चरितार्थासाठी या जोडप्याने कधीही कशाची लाज बाळगली नाही. इतके मोठे नाव झाले असले तरी आजही कष्टकरी जगणं उभयतांनी सोडलेल नाही. फेब्रुवारी 1993 ला त्यांनी सहजीवनाला सुरुवात केली. पाहता पाहता लग्नाचा रौप्य महोत्सव कधी होऊन गेला ते समजलंच नाही. संसाराचा रथ चालवत असताना सामाजिक आणि राजकीय क्षितिजावरही सीताताई सदा भाऊंच्या पाठिंब्यामुळे पोहोचलेल्या आहेत. अनेक कटू आणि गोड आठवणींची शिदोरी बरोबर घेऊन.हे जोडपं समाजाचे हित साधत आहे. अतिशय साधी माणसं असल्याने ते सर्वांनाच भावतात, अहंकार गर्व याचा वाराही त्यांना कधीच लागला नाही. यापुढेही कधी त्यांच्या पर्यंत पोहोचेल असे वाटत नाही. सीता ताई आणि सदाभाऊ यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सत्तावीस वर्षांचा सहजीवनाचा एक प्रकारे हा उत्सवच म्हणता येईल. या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.