विधवा भगिनी  हळदी -कुंकवाच्या पहिल्या धनी

कामोठे येथील महिला मंचने दाखवली समाजाला ‘दिशा’
पनवेल/ प्रतिनिधी:-पतीच्या निधनानंतर त्या  महिलांनी कपाळावर कुंकू लावू नये अशी जुनाट रूढी आहेत. त्याचबरोबर त्या स्त्रीला सार्वजनिक जीवनात वावरता येत नाही. तसेच सण उत्सव आणि साजरे करता येत नाहीत. तिचे एक प्रकारे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते.  या अनिष्ट चालीरीतींना तिलांजली देत 8फेब्रुवारी रोजी वतीने कामोठे येते विधवा महिलांच्या कपाळी सर्वात अगोदर हळदी कुंकू लावण्यात आले . दिशा महिला मंचच्या वतीने समाजाला दिशा देणारा हा पायंडा पाडण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 
 एखाद्या स्त्रीचा पती मृत्यू पावला म्हणजे तिने सण-उत्सव साजरे करायचे नाही. त्याचबरोबर कपाळ पांढरे ठेवायचे हा त्या भगिनीवर एक प्रकारे अनेक वर्षांपासून अन्याय होत आला आहे.  एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना आजही विधवा महिलांना कपाळाला कुंकू लावण्यास विरोध होत आहे. तिला दागिनेही घालत येत नाहीत. तसेच हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमांना निमंत्रण दिले जात नाही. मंगलमय ,उत्साह तसेच आनंदाच्या  क्षणापासून तिला दूर ठेवले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर जुन्या रूढी परंपरा मोडीत काढण्याच्या उद्देशाने  दिशा महिला मंच च्या संस्थापिका नीलम आंधळे, ख़ुशी सावर्डेकर, उषा डुकरे, मनिषा शिंदे ,संगीता राऊत, रुक्मीणी धायगुडे , रेखा ठाकूर ,रुपाली होगडे यांनी हा अनोख उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. व ते सिध्दीस सुध्दा नेला. महिलांना निमंत्रित करीत त्यांच्या कपाळावर हळद आणि कुंकू लावण्यात आले. तसेच त्यांना वाण देऊन सन्मानित करण्यात आले.  त्यांच्यापासून हळदी  कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून   महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे, बचत गट सल्लागार स्नेहा रणदिवे , सोनल इंगवळे, श्रद्धा जाधव उपस्थित होत्या. त्यांनी  या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
 विद्या मोहिते यांनी या हसत खेळत आणि रमलेल्या या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. नालंदा बुध्द विहार येथे हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाल.
महिलांना बचत गट विषयक मार्गदर्शन
उपस्थित महिलांना तेजस्विनी गलांडे, स्नेहा रणदिवे यांनी बचत गटांना बाबत माहिती दिली. बचत गटांची स्थापना,  त्या माध्यमातून कोणते कोणते उपक्रम राबवता येतात. स्वयंरोजगार  कशा पद्धतीने निर्माण केला जाऊ शकतो. बचत गटांचे फायदे याविषयी उपस्थितांना इत्थंभूत माहिती देण्यात आली.