कामोठेत अंधाराच्या जागेवर उजळला प्रकाश

 


बंद पथदिवे सिडकोने केले कार्यान्वित
काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल /प्रतिनिधी:- कामोठे वसाहतीत अनेक सेक्टरमधील रस्त्यावरील पथदिवे बंद अवस्थेत होते. त्यामुळे परिसरात अंधार पसरला होता. परंतु याबाबत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चिखलकर यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार सिडकोच्या इलेक्ट्रिकल विभागाने दखल घेत हे दिवे कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर आता उजेड दिसू लागला आहे.
कामोठे वसाहतीतील जवळपास सर्वच सेक्टर विकसित करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत चालली आहे. बाजूला खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्टेशन आहेत. त्याचबरोबर ही वसाहत पनवेल सायन महामार्गालगत आहे. परिणामी कनेक्टिव्हिटी च्या दृष्टिकोनातून कामोठे या सिडको वसाहतीला राहण्यासाठी अधिक प्राधान्य दिले जाते. परंतु या ठिकाणी अनेक पायाभूत सुविधांचा वाणवा आहे. महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर सिडकोने आखडते हाती घेतले आहेत. रस्ते, गटार यांची स्थिती फारशी चांगली नाही. त्यातच अनेक ठिकाणचे पथदिवे बंद अवस्थेत होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यांवर अंधार पसरत होता. पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्याचबरोबर महिलांमध्ये भीतीचे सावट होते. अंधाराचा फायदा घेऊन चैन स्नॅचिंग चे प्रकार घडत होते. कामोठेकरांना भेडसावणाऱ्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चिखलकर यांनी सिडकोच्या इलेक्ट्रिकल विभागाकडे अखंडित पाठपुरावा केला. अधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती कथन केली. त्याचबरोबर पत्रप्रपंच सुद्धा केला. याची दखल घेत सिडकोने ठेकेदाराच्या मार्फत
सेक्टर 6, 34, 35 आणि 36 36, येथील बंद असलेले सर्व पथदिवे सुरू केले. त्यामुळे रात्रीच्या वेळी दाटणाऱ्या अंधाराची जागा उजेडाने घेतली आहे.