हर्बल लाईफला चार कोंटीचा ‘चुना’

 

 

 

बनावट कागदपत्रे, शिक्के बनवले

पनवेल शहर पोलीसांकडून गुन्हाची उकल  

पनवेल/प्रतिनिधी- हर्बल लाईफ इंटरनॅशनल इंडिया प्रा लि या कंपनीची   बनावट कागदपत्रे , शिक्के , लेटर पॅड , चेक  आणि सहया करून  कंपनीच्या चार कोटी १० लाख रूपये फसवणुक करण्यात आली. या गुन्हयाची उकल पनवेल शहर पोलीसांनी केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी सात आरोपींना बेडया ठोकल्या. याप्रकरणाचा सखोल तपास पुढे सुरू आहे. यामध्ये आनखी कोणाचा हात आहे का याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कंपनीचे आय सी आय सी आय बँकेच्या पनवेल  शाखेत खाते होते.  एका अनोळखी इसमाने |हर्बल लाईफ इंटरनॅशनल इंडिया प्रा . लि . या कंपनीचे बनावट लेटरहेड तयार केले.  त्यावर कंपनीचे बनावट रबरी शिक्का मारले  , खोटया सहया करून , नमुद कंपनीच्या नावे बॅकेत असलेल्या खात्याचा मोबाईल क्रमांक बदली करण्यासाठी सदरचे लेटर हेड बॅकेत दिले.  बनावट चेकद्वारे या  कंपनीच्या खात्यात असलेली 4 कोटी 10 लाख रू रक्कम आर . के . इंटरप्राईज यांचे इंडसइंड बँकेतील खात्यात वर्ग करण्यात आले.    दिलेल्या तकारीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे . सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार ,सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर , परिमंडळचे  पोलीस उप आयुक्त अशोक दुधे यांनी महत्वपूर्ण सुचना दिल्या  त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या  मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक इशान खरोटे,निलेश रजपुत, दिलीप चौधरी, पंकज पवार,दिनेश जोशी, अजय कदम, राहुल साळुंखे, केशव शिंदे यांनी   या किचकट व गुंतागुतींच्या गुन्हातील तपासात विविध बँके खात्याची माहिती घेतली.  अनेक  ठिकाणी सापळे लावले.तसेच गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून आरोपींचा   मुंबई , ठाणे , नवी मुंबई येथे शोध घेण्यात आला. त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.    गुन्हा घडलेल्या आय . सी . आय . सी . आय  बँकेच्या पनवेल शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये हात असल्याचे प्रथमदर्शी उघड झाले आहे.  त्यानुसार  बॅकेतील अधिकारी कर्मचारी यांची चौकशी सुरू आहे  त्यांचा  सहभाग असल्याशिवाय सदरचा गुन्हा होवु शकत नाही . हे तपासात पुढे आले आहे. व आरोपींना बँकेच्या कंपनीचे खात्याबाबत सर्व गोपनिय माहिती दिली आहे.  सदरचा गुन्हा करणे इतर आरोपींना करता आल्यांचे  तपासात निष्पन्न झाले आहे . रामकिशन पांडे (51) उल्हासनगर, अमिताभ मित्रा(61) रा.सांताक्रुझ, अराफत शेख(33) नेरूळ, विनोद भोसले(44) कळंबोली, जावेद कुरेशी(55) मुंबई, श्रीजील कुरपम्बील(39) डोंबिवली, मुकेश गुप्ता (45) घणसोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.