हातातील शिवबंधनच बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद

 

आमदार निलेश लंके यांचे स्पष्टोक्ती
निलेश लंके प्रतिष्ठान च्या कल्याण शाखेचे उद्घाटन
कल्याण/ प्रतिनिधी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना पुष्पगुच्छ घेऊन शुभेच्छा देण्यासाठी गेलो. आणि त्यांनी मला प्रश्न विचारला तुमच्या हातात शिवबंधन! तेव्हा मी उत्तर दिले होय! हा शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. अशी स्पष्टोक्ती पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांनी रविवारी कल्याणी येथे दिली. याठिकाणी निलेश लंके प्रतिष्ठान च्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी आ .लंके बोलत होते
कल्याण येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ भोईर, निलेश लंके प्रतिष्ठान चे प्रांताध्यक्ष सुदाम पवार, पारनेर पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते, निलेश लंके प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष सुरेश धुरपते, ज्येष्ठ सल्लागार राजू शेठ चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, गोरखनाथ आहेर, भाऊ पावडे, चंद्रकांत नवले, एॅड राहुल झावरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आपण घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलो असलो तरी आजही मनगटात शिवबंधन आहे. याबाबत मला अनेक जण प्रश्न विचारतात कि शिवबंधन कसे तर त्याचे उत्तर असे की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण राजकारणात आलो. शिवबंधन म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे. असे आमदार निलेश लंके यांनी ठामपणे सांगितले. उद्धव ठाकरे हे अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. तसेच प्रशासनावर वचक आणि अनुभव असणारे अजित दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे भविष्यात, शेतकरी, व्यवसायिक, व्यापारी आणि नोकरदारांच्या हिताचे निर्णय महाविकास आघाडी नक्की घेईल असा विश्वास आ. लंके यांनी व्यक्त केला. कल्याण ही निलेश लंके प्रतिष्ठान ची मुंबई मधील पाचवी शाखा आहे. संघटना किंवा एखादी संस्था सुरू करणे सोपे असते. मात्र ती टिकवणे अवघड असते. याठिकाणी ही शाखा सुरू करण्यात आली आहे . त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी सदस्यांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 100% काम करावे असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले. आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी प्रयत्न करावेत असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. निलेश लंके प्रतिष्ठान च्या माध्यमातून कृषी प्रदर्शन, महिलांना देवदर्शन, बेरोजगारांसाठी मेळावा यासारखे अनेक उपक्रम राबवले जातात. आता सामुदायिक विवाह सोहळा ही आयोजित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. राजेशाही थाटात मध्ये 101 लग्न यावेळी लावून देण्याचा माणूस प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचेही निलेश लंके म्हणाले.

रेस का घोडा कभी रुकता नही और थकता भी नही!
आपल्याला जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी 24 तास 365 दिवस तत्पर असतो. हे काम करीत असताना मला अनेक जण विचारतात. तुमच्याकडे इतकी ऊर्जा कुठून येते? तेव्हा त्यांना मी सांगतो ची ही ऊर्जा ही जनतेच्या प्रेमातून आलेली आहे. आणि ही ताकद मला मिळाली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. रेस का घोडा कभी रूकता नही और थकता भी नही! असे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

सरपंच ते आमदार …. शाखाप्रमुख पदापासून ते तालुकाप्रमुख
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना प्रशासनात आणि संघटनात्मक केलेल्या कामांचा अनुभव उपयोगी पडत आहे. सरपंच ते आमदार आणि शाखाप्रमुख पदापासून ते तालुकाप्रमुख असा माझा राजकीय प्रवास असल्याचे निलेश लंके यांनी सांगितले. कदाचित तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे विलासराव देशमुख यांच्यानंतर माझाच नंबर असेल असे मतही आ लंके यांनी व्यक्त केले.