प्रेमाला मिळाली करूणेची ‘दिशा’

आजी- आजोबांसोबत दिशा महिला मंचचा व्हॅलेंटाईन
करूणेश्वर वृध्दाश्रमात अनोखा उपक्रम साजरा 
पनवेल /प्रतिनिधी:- खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे! जयांना ना कोणी जगतात  ते सदा अंतरी रडती ,त्यांना जाऊन सुखवावे! जगाला प्रेमाला अर्पावे या उक्तीप्रमाणे दिशा महिला मंचने 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे करूणेश्वर या वृद्धाश्रम साजरा केला. आजी- आजोबांना या दिवशी मंचच्या हिरकणी खऱ्या अर्थाने प्रेम वाटले. सर्वांची  आपल्या पणाच्या भावनेतून विचारपूस करीत त्यांना गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त केले. या अनोख्या उपक्रमामुळे संपूर्ण करुणेश्वर मध्ये एक प्रकारे प्रेमाच्या रंगाची उधळण झाली.
 व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपल्या जिवलगांवरील प्रेम खुल्या मनाने व्यक्त करण्याचा दिवस होय. माणसाला माणसाशी जोडणार नामिक आणि अनामिक नातं म्हणजेच प्रेम . प्रेम हे प्रेम असत तुमच आमच अगदी सेम असत असं जरी म्हटलं जात असले तरी  प्रत्येकाच्या प्रेमाच्या संकल्पना या वेगवेगळ्या असतात . या वर्षी प्रेमाच्या या उत्सवात निराधार आजी आजोबांच्या जीवनात आनंदी क्षणाचे रंग भरण्याचे काम दिशा मंचने केले. व्हॅलेंटाईन डे व  मंचच्या सदस्या गीतांजली नायकोडी यांचा वाढदिवस असा दुहेरी योग जुळून आला. या निमित्ताने करुणेश्वर येथील आश्रमाला भेट देऊन फळे बिस्किटे ड्रायफ्रुटस आणि गुलाबफुल आजी-आजोबांना देण्यात आले . त्यांच्याशी हितगुज साधण्यात आले. अतिशय अस्थेने विचारपूस करण्यात आली. त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी हास्यविनोद करण्यात आला. येथील वृद्ध माता पितांनी सुद्धा आयुष्यातील आपले अनुभव कथन केले.
 प्रेम दिल्याने वाढत व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी हे प्रेम वाटण्याचे व वाढवण्याचे निरपेक्ष कार्य दिशा ग्रुप च्या हिरकणींनी केले. 
“प्रेम हे कोणीही कोणावर करावे, गाईने वासरा वर, साईने दुधावर, प्रेमाला सीमा मर्यादा नसतात. ती एक उदात्त संकल्पना आहे. त्याप्रमाणे आम्ही करुणेश्वर वृद्धाश्रमात जाऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला. या माध्यमातून तेथील सर्व वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला, हीच खरी या निस्वार्थी प्रेमाची पावती आम्हाला मिळाली.”
नीलम आंधळे
संस्थापिका दिशा महिला मंच