एक चमचा कमी…. चार पावलं पुढे!

 

 


औषध विरहित निरोगी आयुष्याचा अभिनव उपक्रम
रोटरी क्लब व सामाजिक संस्थांचा पुढाकार
पनवेल /प्रतिनिधी पनवेल परिसरातील नागरिकांसाठी औषध विरहीत निरोगी आयुष्याकडे वाटचाल हा उपक्रम 12 जुलै 2020 रोजी राबवण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब व इतर सामाजिक संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. वलप येथे प्रायोगिक स्वरूपात अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याला ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. शिवाय बदललेली आहार पद्धती, यामुळे  व्यक्ती स्वतःच आजारांना निमंत्रण देत असतो. अशावेळी संतुलित आहार  व आरोग्याची कशी काळजी घ्यावी, यासाठी त्याला डायटीशियनची मदत घ्यावी लागते. हे सर्व पाहता नेहमीच्या आहारातून तेल, साखर व मीठ कमी करण्यासाठी  ‘ एक चमचा कमी…. चार पावलं पुढे!’ हा आरोग्यमंत्र घेऊन रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि ग्रामपंचायत वलप यांच्या संयुक्त विद्यमाने, वलप व आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी वलप ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचं उद्घाटन, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे माजी प्रांतपाल तथा प्रख्यात सर्जन, डॉक्टर गिरीष गुणे यांच्या हस्ते करण्यात आलं. 
या शिबिरात रक्त शर्करा, रक्तदाब, बॉडी मास इंडेक्स ची मोफत तपासणी करण्यात आली. याप्रसंगी पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, वलप ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ पाटील, डॉ अमोद दिवेकर, डॉ. राजेश गांधी, डॉ. अभय गुरसाळे,डॉ .   लक्ष्मण आवटे, डॉ. तुषार जोशी, डॉ सी. डी. कुलकर्णी, डॉ. संजीवनी गुणे, डॉ. कांचन दिवेकर, डॉ. जया गुरसाळे, प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन लक्ष्मण पाटील, रो.विवेक खाड्ये, सायली सातवळेकर, आरती खेर, दिपक गडगे, ज्योती गडगे, सुप्रिया खाड्ये, पुष्पलता पाटील, संतोष घोडिंदे, शोभा रानाडे, प्रकाश रानाडे, शैलेश पोटे, वृषाली पोटे, हितू शहा, जया गुरसळे, अभय गुरसळे, शिरिष वारंगे, वैदांग वारंगे, रसिक  करवा, मनोज आंग्रे, जान्हवी खाड्ये, प्रितम कैया, प्रशांत पांडे, भगवान पाटील, नंदिनी वैलणकर, के गोपााल इत्यादी मान्यवरांसह रोटेरियन्स,रोटरी ऍन, ग्रामपंचायतीचे सदस्य व शिबिरार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना निरोगी आयुष्याचा कान मंत्र देताना डॉक्टर गिरीश गुणे म्हणाले की, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड करतो. वेळी-अवेळी व अनियमित खाणं यामुळे आपलं शरीर व्याधी जर्जर होऊ लागतं. मात्र आपण मनात आणलं तर हे सगळं टाळू शकतो, असे स्पष्ट करताना डॉक्टर गुणे म्हणाले की, आपल्या दैनंदिन आहारामध्ये तेल, मीठ आणि साखर त्यांची मात्रा, एक चमच्याने कमी केली, तर आपल्याला जडणाऱ्या अनेक व्याधींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो.या शिबिरात कोणत्याही औषधांचे वाटप करण्यात आले नाही. दरम्यान रोटरीच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ठीक ठिकाणी अशा पद्धतीच्या आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येणार असून, या शिबिरामध्ये
३१७ रुग्णाची तपासणी केली. त्यांची पुन्हा सहा महिन्यानंतर तपासणी करून, त्यांच्या आरोग्यासंबंधीचा पाठपुरावा केला जाईल, असे डॉ गिरीश गुणे यांनी सांगितले.