आदिती ताईंचा सेल्फी

अनेकदा सेलिब्रिटी राजकारणी यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा अनेकांना मोह आवरत नाही. कित्येकांची कॅमेरे त्यावेळी सेल्फी मोडवर जातात. रविवारी पनवेल या ठिकाणी आलेल्या रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यासमवेत उपस्थित महिलांनी सेल्फीचा आग्रह धरला. आदिती ताईंनी स्वतःच्या हातात मोबाईल घेऊन सेल्फी मोडवर केला. आणि सर्व भगिनींना समवेत स्वतः सेल्फी काढून दिला. त्यामुळे सर्वांच्या चेहर्‍यावर आनंदाचा सेल्फी दिसला. त्याचबरोबर पालकमंत्र्यांचा साधेपणा आणि जनतेमध्ये रममान होण्याची छबी सुद्धा ऍड सुलक्षणा जगदाळे त्यांच्यासह अनेकांच्या कॅमेऱ्यात क्लिक झाली.