वीर बाजीप्रभू देशपांडे संघांने  कबड्डीचे मैदान जिंकले

वीर तानाजी मालुसरे विभागीय प्रीमियर लीग चे उपविजेते
खांदा वसाहतीत रंगला कबड्डीचा थरार
पनवेल /प्रतिनिधी :- राजा शिवछत्रपती क्रिडा मंडळ व साईनाथ मित्र मंडळाच्यावतीने  खांदा कॉलनी विभागीय कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा रविवारी संपन्न झाली. यानिमित्ताने क्रीडाप्रेमींना कबड्डी चा थरार अनुभवायला मिळाला. वीर बाजीप्रभू देशपांडे संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तर तानाजी मालुसरे यांच्या नावाने खेळलेल्या संघाला उपविजेतेपद मिळाले.चित्तथरारक सामने पाहण्याकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
सेक्टर 7 येथे पार पडलेल्या या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. अशाच प्रकारचे सामने आयोजित करून कबड्डीला खऱ्या अर्थाने पाठबळ देण्याची गरज असल्याचे आ. ठाकूर यांनी व्यक्त केले. या खेळाला चांगले दिवस आले असल्याचेही ते म्हणाले. रायगड आणि कबड्डी एक वेगळे नाते आहे. या जिल्ह्याने अनेक कबड्डीपटू दिले असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. सीताताई पाटील यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी चित्तथरारक सामने सुद्धा पाहिले.
कबड्डी हा रांगडा खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या फिवरमध्ये या क्रीडा प्रकाराला गेल्या काही वर्षांपासून ग्लॅमर येऊ लागले आहे. आयपीएलच्या धर्तीवर अनेक स्थानिक प्रीमियर  लिग स्पर्धेचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर खांदा वसाहतीत सुद्धा मॅटवर विभागीय कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न झाली. प्रकाश झोतातील हे सामने पाहण्याकरीता कबड्डी शौकिनांना मोठी गर्दी केली होती. सहभागी संघातील खेळाडूंनी अतिशय उत्तम खेळ करीत क्रीडा रसिकांना जिंकून घेतले. कबड्डीचा थारार खांदा वसाहतीत बऱ्याच कालावधीनंतर अनुभवायला मिळाला. त्यामुळे या स्पर्धेचे  एक प्रकारे कुतूहल निर्माण झाले होते.
  वीर बाजी प्रभू देशपांडे व   वीर तानाजी मालुसरे या संघांमध्ये अंतिम सामना झाला. अतिशय चुरशीच्या या लढतीत बाजीप्रभू देशपांडे संघाने बाजी मारली. वीर कोंडाजी फर्जत
वीर बहिर्जी नाईक  टीमने अनुक्रमे कृती आणि चतुर्थ क्रमांक पटकावला. नगरसेविका सीताताई पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष  निखिल भुवड आणि उपाध्यक्ष आकाश दळवी यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.