सुनील खाडे महाराष्ट्र मंत्रालय बँकेवर

 


संचालकपदी मोठ्या मताधिक्क्याने विजय
अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल/ प्रतिनिधी: – महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी, कर्मचारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधीक्षक सुनिल खाडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या या बँकेची उलाढाल सुमारे सहाशे ते सातशे कोटी पर्यंत असल्याने या बँकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. निवडीबद्दल खाडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
महाराष्ट्र मंत्रालय अ‍ॅण्ड अलाईड ऑफिसेस को ऑपरेटीव्ह बँकेच्या पंधरा संचालक पदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत सभासदामधील प्रमुख दोन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भटक्या जमाती, विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून तगडे तीन उमेदवार असल्याने या गटातून कोण निवडून येणार याची उत्सुकता होती. मात्र माहिती व जनसंपर्क विभागातील अधीक्षक सुनिल खाडे यांनी आपले प्रतिस्पर्धी मंत्रालय संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मुंजाळे, जिमखाना संचालक सतीश सोनवणे यांना पराभूत केले. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी सभासद आहेत . तर सभासदांना बँकेतून तात्काळ कर्ज देण्याची सुविधा आहे. यामुळे या बँकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. मंत्रालयातील कर्मचार्‍यांच्या अडीअडचणीत कायम धावून जाणारे सुनिल खाडे यांचा मोठा संपर्क आहे. त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत सुनिल खाडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय म्हणून संचालक पदी विराजमान झाले. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, कोकण विभागाचे माहिती संचालक गणेश मुळे, वरिष्ठ संशोधन अधिकारी त्रिंबक केंन्द्रे पाणी पुरवठा विभागातील अभियंता कुमार खेडकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर पनवेल परिसरातील नाही प्रतिष्ठित व्यक्तींनी खाडे यांना सन्मानित केले.