बनकर,रणवरे यांची भाजप सरचिटणीसपदी नियुक्ती

 

तर मोनिका महानवर  उपाध्यक्ष
कळंबोली मंडलाची कार्यकारिणी जाहीर
पनवेल प्रतिनिधी:- भारतीय जनता पक्षाच्या कळंबोली मंडलाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या मंडल सरचिटणीसपदी ज्येष्ठ नेते राजेंद्र बनकर, युवा कार्यकर्ते प्रशांत रणवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .तर उपाध्यक्ष म्हणून नगरसेविका मोनिका महानवर यांची निवड करण्यात आली उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका मंडळ अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या आदेशानुसार कळंबोली मंडल अध्यक्ष रवीनाथ पाटील यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
उपाध्यक्षपदी दिलीप बिष्ट, कुमार झा, संदीप भगत, सुधीर अहिरे, सचिवपदी संतोष गायकवाड, दत्ता बिनवडे, बजरंगबली सिंग, शेर बहादूर सिंहम प्रमिला पाटील, बायजा बारगजे, कोषाध्यक्षपदी महादेव कोळी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कळंबोली महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी मनिषा निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग ७ च्या अध्यक्षपदी संजय दोडके, प्रभाग ८ अध्यक्षपदी प्रकाश शेलार, प्रभाग १० अध्यक्षपदी रामदास महानवर, तसेच उत्तर भारतीय आघाडीच्या अध्यक्षपदी केशवलाल यादव, वकील सेलच्या अध्यक्षपदी प्रवीण पाटील, व्यापारी सेलच्या अध्यक्षपदी कमल कोठारी, वैद्यकीय सेलच्या अध्यक्षपदी डॉ. सागर पाटील, दक्षिण भारतीय आघाडी सेलच्या अध्यक्षपदी निषित उछबली, भटके विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी आबासाहेब घुटुकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.