राष्ट्रीय एकात्मतेसाठी सावित्रीच्या लेकींचा रॅम्प वॉक

 

नारी शक्तीने दिला भारतीय आहोत चा नारा
कामोठे सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद
दिशा महिला मंचने साजरा केला अनोखा महिलादिन
पनवेल प्रतिनिधी:- नागरिकत्व कायदयाच्या मुद्दयावरून देशात हिंसक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे लोण रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये पोहचले. यामुळे राष्ट्रीय एकात्मकतेला एक प्रकारे बांधा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती अबाधीत राहावी यासाठी काही सामाजिक संस्थाने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये दिशा महिला मंचनेही पाऊल उचलले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंचच्या वतीने कामोठे सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेचे आयोजन केले होते. यानिमित्ताने स्पर्धक महिलांनी भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेली साडी परिधान करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. नारीशक्तीने आपण सारे भारतीय आहोत या स्लोगन च्या माध्यमातून एकतेचा नारा दिला.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असललेल्या भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. विविधेतून एकतेचे दर्शन घडविणारे या भारतात अनेकदा काही विघातक शक्ती तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. धर्मा धर्मांमध्ये वाद तंटे लावून वातावरण हिंसक करण्याचा प्रयत्न केले जातात. नागरीत्व कायदयावरून गेल्या काही दिवसापासून देशात अनेक ठिकाणी जातीय व धार्मिक तेड निर्माण झाला आहे. यावरून हिंसा घडविली जात आहे. त्यामुळे एकतेला बाधा पोहचू लागली आहे. श्रीवर्धनमध्ये हिंदु –मुस्लिमाच्या एकोप्याचा बांधा यामुळे पोहचल्याचे दिसून आले. हे लोन इतरत्र पोहचू नये असे प्रत्येक भारतीय नागरिकाला वाटते. त्याकरीता काही सामाजिक संस्थाकडून जागृती केली जात आहे. त्यामध्ये  दिशा महिला मंचने पुढकार घेण्याचा संकल्प केला.७ मार्च रोजी कामोठे येथील आगरी समाज सभागृहात महिला दिनाच्या निमित्ताने सौर्दय सम्राज्ञी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्पर्धक सहभागी झाल्या. त्यांनी साडी परिधान करून रॅम वॉक केला. साडी हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. प्रत्येक राज्यानिहाय साडी परिधान करण्याची पध्दत वेगळी आहे. त्यानुसार साड्या परिधान करून कामोठे येथील सौंदर्य वतींनी उत्कृष्टरित्या रॅम्प वॉक केला. राष्ट्रीय एकात्मता दर्शवणाऱ्या स्लोगन च्या माध्यमातून एक प्रकारे देशप्रेम आणि राष्ट्र भक्तीचे वातावरण यानिमित्ताने निर्माण करण्यात आले. त्याचबरोबर फॅशन शो तसेच सौंदर्याबाबत अनेक महिलांना आवड असते. परंतु संधी मिळत नाही. मात्र दिशा महिला मंचने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्थानिक भगिनींना यानिमित्ताने व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे सहभागी झालेल्या स्पर्धक तसेच उपस्थितांना स्त्रियांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला. डॉ रजत जाधव , सूरदास गोवारी , इंदू झा , जयसुधा हेगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.श्रुणाल जाधव , श्रीजीता बॅनर्जी आणि डॉ शितल गोसावी यांनी काम पहिले . डॉ नितीन थोरात, महेश चव्हाण,शैलेश ठाकूर , शहाजी पुंडे , रोशनी ओरपे यांचे विशेष सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमेधा लिमन तर आभार विद्या मोहिते यांनी मानले.रेखा ठाकूर, उषा डुकरे, ख़ुशी सावर्डेकर यांच्या खडतर मेहनतीने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.दिशा महिला व्यासपीठाच्या अध्यक्षा निलम आंधळे यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ती हिरकणी पुरस्कार प्रदान
सामाजिक क्षेत्रात अविरत काम करणाऱ्या .मिराताई लाड , मनिषा अहिवळे पवार , रिनी लॉरेन्स या तीन महिलांना ‘ती’ हिरकणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

दिपाली खरात कामोठे सौंदर्य सम्राज्ञी
कामोठे सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा दिपाली खरात या महिला स्पर्धकाने जिंकली. तर रुपाली होगडे फस्ट आणि दीपा कुडाळकर सेकंड रनर अप ठरल्या.10 महिलांना विविध नामांकनाने गौरविण्यात आले.

“विश्वकर्ता हा जग रंगविणारा एक कुशल रंगारी असेल तर स्त्री ही त्यानं रंगविलेली सर्वोत्कृष्ट रंगाकृती म्हटली पाहिजे. या उक्तीप्रमाणे आणि विविध
प्रकारच्या साड्या परिधान करून विविधतेत एकता दाखवण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून करण्यात आला होता . कामोठे येथील महिलांना या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. कामोठे सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेत अतिशय सुंदर फॅशन शो पार पडला. या निमित्ताने अनोखा महिला दिन साजरा करता आला. याचा मनोमन आनंद आहे.”
नीलम आंधळे
संस्थापक अध्यक्ष दिशा महिला मंच
कामोठे