निलेशदादा मंत्री व्हावेत ही माझी प्रामाणिक इच्छा 

 


मावळचे आमदार सुनील शेळके यांचे मत
आमदार लंके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पारनेर /प्रतिनिधी:- मागील वर्षी दहा मार्च रोजी कार्यकर्त्यांनी विधानसभेची प्रतिकृती असलेला केक आणला होता. यावेळी लाल दिव्याची गाडीचा असलेला केक येथे दिसतोय. ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची ही भावना . एक वेळ या सुनील अण्णाला नाही मिळाले तरी चालेल. मात्र आ. निलेश दादा यांना मंत्रीपद मिळालेत पाहिजे. हे मी राजकारण म्हणून नाही तर प्रामाणिक पणे मत व्यक्त करतो. असे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. आ. लंके यांचा मंगळवारी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
हंगा येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. आ. शेळके यांनी आमदार निलेश लंके यांचा कार्याचे कौतुक करत ते सर्वसामान्यांचे नेतृत्व करण्याचे सांगितले. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. माझ्या बद्दल त्यांच्या मनातलं प्रेम आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात इतके प्रेम का आहे. हे याठिकाणी आल्यानंतर नंतर मला समजले. त्यांच्याकडे पैशाची नाही. तर माणुसकी आणि आपुलकीची श्रीमंती असल्याचे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले. आमदार निलेश दादा हे तुमच्याप्रमाणे माझे सुद्धा नेते आहेत. म्हणून मी त्यांना नेते असेच संबोधतो. या अगोदर ते वेगळया पक्षात होते. आणि मी वेगळ्या पक्षात होतो. परंतु येथील जनतेने त्यांना आमदार करण्याचे ठरवले. आणि मावळ करांनी त्या भागाचा विकास करण्यासाठी मला सुद्धा विधानसभेत पाठवले . मंत्रालय असो किंवा विधिमंडळ निलेश दादांच्या हातात एक आणि कानाला एक मोबाईल असतो. कधी भेटले तरी त्यांचं बोलणं सुरूच असतं. मी म्हणतो नेते फोन बाजूला ठेवून माझ्याशी बोला. ते म्हणतात सुनील अण्णा एक मिनिट थांबा. या मोबाईल मुळेच मी आमदार झालो आहे. त्यांचा एक मिनिटात कधी होत नाही. आणि नेत्यांच माझं बोलणं होत नाही. असे त्यांनी सांगतात एकच हशा पिकला. या मतदारसंघात आताच कोणीतरी सांगितले की 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मी मोठ्या विश्वासाने सांगतो की पुढील पाच वर्षात पारनेर नगर मध्ये नेते सातशे कोटी रुपयांचा निधी आणतील असेही ते म्हणाले. मेहबूब शेख यांनी आपल्या भाषणात आ . लंके यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. या देशाचे नेते शरद पवार साहेब कधी कोणाला पावती देत नाहीत . मात्र आमदार निलेश लंके यांना दुसरे आर. आर .पाटील म्हणून ते संबोधतात. यापेक्षा दुसरे यश ते काय. आमदार लंके आणि सुनील अण्णा शेळके यांच्यावर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने अन्याय केला. मी तर म्हणतो. या दोन पक्षांनी या दोघां सारख्या आणखी वीस पंचवीस जणांवर अन्याय करायला पाहिजे होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये आणखी भर पडली असती असेच शेख बोलतात टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी आमदार निलेश लंके हे खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे नेते असल्याचे सांगितले. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे हे नेतृत्व असल्याचे सांगून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठानचे प्रमुख सल्लागार राजेंद्र चौधरी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर निलेश लंके प्रतिष्ठान चे महाराष्ट्र अध्यक्ष सुदाम पवार यांनी प्रास्ताविक केले. बाबाजी तरटे यांच्यासह इतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.अॅड राहुल झावरे यांच्या नेतृत्वाखाली निलेश लंके प्रतिष्ठान च्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.