भाजपचे कळंबोलीत करोना बचाव अभियान

 


माहिती पोस्टर व हॅड सेनेटायझर आणि मास्क चे वाटप
नगरसेवक राजेंद्र शर्मा यांचा पुढाकार
पनवेल/ प्रतिनिधी: – जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. लाखो रुग्णांना बाधा झाली आहे. दरम्यान या महाभयंकर व्हायरस पासून बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी शुक्रवारी पोलीस ठाणे, वाहतूक शाखा त्याचबरोबर शाळा आणि अंगणवाड्यात माहिती पोस्टर हॅड सेनेटायझर आणि मास्क चे वाटप केले. यावेळी घाबरू नका पण काळजी घ्या असे आवाहन भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले.
करोना वायरसने जगभरात थैमान घातले आहे. या रोगाने काहींचा बळी गेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला महामारी म्हणून घोषित केले आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात या विषाणूंची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात खबरदारी घेण्यात आली आहे. शासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. असे असले तरी करोना व्हायरस बाबत अद्याप अनेकांना माहिती नाही. हा रोग किती महाभयंकर आहे. त्याचबरोबर त्याची लक्षणे काय आहेत. त्यावर उपचार आहेत की नाहीत. यासारख्या अनेक गोष्टीं पासून कित्येक जण दूर आहेत. या रोगाची लागण होऊ नये याकरीता काय खबरदारी घेतली पाहिजे. याविषयीही अनेक जण अनभिज्ञ आहेत. त्या पार्श्वभूमीवर करोना व्हायरस बाबत जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे.
प्रभाग समिती कार्यालय, कळंबोली रोडपाली व खिडुकपाडा जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या कळंबोली पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखा येथेमाहिती पोस्टर हॅड सेनेटायझर आणि मास्क चे वाटप केले. या वेळी भाजप कळंबोली शहर अध्यक्ष राविनाथ पाटील,शहर सरचिटणीस राजेंद्र बनकर, प्रशांत रणवरे, जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश शेलार ,कमल कोठारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.