अहमदनगर मध्ये तीन करोना संशयित पळाले

 


जिल्हा रुग्णालयाची पोलिसांत तक्रार
अहमदनगर /प्रतिनिधी: – अहमदनगर मध्ये करोना चे तीन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण वार्ड मध्ये ठेवण्यात आले होते. परंतु या रुग्णांनी शनिवारी त्या ठिकाणाहून पळ काढला. दरम्यान याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. संबंधित रुग्णांनी अशाप्रकारे पळून जाणे अतिशय घातक असल्याने त्यांना पकडण्यात यावे असे रुग्णालयाने दिलेल्या तक्रार पत्रात म्हटले आहे.
करोना चा एक रुग्ण अहमदनगर मध्ये सापडला आहे. त्याचबरोबर आणखी तीन संशयित रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
त्यांना जिल्हा रुग्णालयातील येथील आयसोलोशन वॉर्ड मध्ये आंतररुग्ण म्हणुन दाखल होते. मात्र ते रुग्णालयाच्या वॉर्डमधुन पळुन गेले . सदर रुग्ण हे कोरोना संशयित असून ते समाजाच्या दृष्टीने घातक सिद्ध होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्वरित तोफखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान हे रुग्ण त्याठिकाणाहून पळाले कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.