गिरीश गुणे गावदेवी पुरस्काराने सन्मानित

 

पनवेल शहरातील गावदेवी मित्र मंडळाच्या वतीने पुरस्कार प्रदान
पनवेल/ प्रतिनिधी: – गोरगरीब आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा देणारे. सामाजिक क्षेत्रात कायम अग्रेसर असणारे. तसेच ज्यांच्या हाताला कायम गुण असतो. अशा डॉ गिरीश गुणे यांना पनवेल शहरातील गाव देवी मित्र मंडळाच्या वतीने गावदेवी पुरस्कार 2020 देऊन सन्मानित करण्यात आले. महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गावदेवी पाडा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. गिरीश गुणे यांच्या जीवनावर चित्रफीत दाखविण्यात आली. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, रुचीता लोंढे, डॉ.राजू बुधकर, गोगटे , युवानेते पवन सोनी, सुधाकर भाऊ घरत, मंडळाचे प्रशांत शेट्ये, अवधूत घरत, मनोज भोपी, श्रीकांत भोपी  यांच्यासह मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. नवीन पनवेल येथील रणसह्याद्री ढोलताशा पथकाने आपली कला सादर केली.
डॉ.गिरीष गुणे यांचे वैद्यकीय क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात असलेले कार्य हे अत्यंत कौतुकास्पद आहे. हे कार्य म्हणजे आमच्या सारख्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक असून त्यांच्या कार्याचा वसा घेवून सर्वांनी यापुढे काम केल्यास ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन परेश ठाकूर यांनी केले.