पनवेल इंडिया बुल्समध्ये करोना विलगीकरण कक्ष

 

 

रेंटल स्कीमची हजार घर ताब्यात घेणार
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश
पनवेल प्रतिनिधी- करोना व्हायरस बाबत रायगड जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. करोना बाधीत, संशयित त्याचबरोबर त्यांच्या सानिध्यात आलेल्या तसेच परदेश वारी करून जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांसाठी विलगीकरण वार्ड ची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोन येथील इंडियाबुल्स रेंटल स्कीम मधील एक हजार घरे जिल्हा प्रशासन ताब्यात घेणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश काढले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाण संक्रमण हा ‘ जागतिक साथीचा रोग घोषित केला आहे . त्यानुषंगाने राज्याच्या मुख्य सचिवांनी १२ मार्च रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली . त्यामध्ये चीन , इटली , दक्षिण कोरिया , स्पेन , इराण , फ्रान्स , दुबई या करोना विषाणू बाधित देशातून भारतात येणा – या प्रवाशांना निगराणीखाला ठेवण्याच्या अशा सूचना दिलेल्या आहेत . त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी हॉस्पिटल पासून दूर अंतरावर स्वतंत्र पक्षाची संख्या वाढवणे आवश्यक आहे. तसेच करोना विषाणूंची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी विलगीकरण वार्ड सुद्धा कमी आहेत. विषाणू बाधित देशातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्क कोण – कोण आले आहे . याची माहिती पोलीस विभाग , महसूल विभागाच्या मदतीने घेऊन परदेशातून आलेल्या प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचीही योग्य निगराणी करावी . अशा सूचना मुख्य सचिव आणि दिलेल्या आहेत. जेणे करुन करोना विषाणु संक्रमण वाढणार नाही . दरम्यान रायगड जिल्ह्यात परदेश वारी करणाऱ्या तसेच करोना बाधित आणि संशयितांना ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोन- सावळे रसायनी रोडवर इंडिया बुल्स रेंटल हाऊसिंग स्किममधील 18 माळ्याच्या 3 व 4 मधील
एक हजार घरे ताब्यात घेतले जाणार आहेत. तसे आदेश
पनवेल महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन 2005 नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत. या रोगाचे निर्दलन झाल्यानंतर खोल्या संबंधितास सुस्थितीत परत कराव्यात असे म्हटले आहे.

स्थानिकांचा ग्रामस्थांचा विरोध ?
इंडिया बुल्समध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यास स्थानिक ग्रामस्थानी विरोध केला असल्याचे समजते.अशा प्रकारे संसर्ग झालेले रूग्ण येथे ठेवू नयेत अशी मागणी त्यांनी केली आहे.