पळून गेलेले करोना संशयित पुन्हा रुग्णालयात

 


अहमदनगर जिल्हा रुग्णालयाची माहिती
अहमदनगर /प्रतिनिधी: – अहमदनगर मध्ये करोना चे तीन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण वार्ड मध्ये ठेवण्यात आले होते. परंतु या रुग्णांनी शनिवारी त्या ठिकाणाहून पळ काढला. दरम्यान याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. दरम्यान याबाबत वृत्तही प्रसिद्ध झाले होते. दरम्यान तासांमध्ये हे तिनही रुग्ण जिल्हा रुग्णालय हजर झाले. असे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.

करोना चा एक रुग्ण अहमदनगर मध्ये सापडला आहे. त्याचबरोबर आणखी तीन संशयित रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
त्यांना जिल्हा रुग्णालयातील येथील आयसोलोशन वॉर्ड मध्ये आंतररुग्ण म्हणुन दाखल होते. मात्र ते रुग्णालयाच्या वॉर्डमधुन पळुन गेले . सदर रुग्ण हे कोरोना संशयित असून ते समाजाच्या दृष्टीने घातक सिद्ध होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्वरित तोफखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात यावे असे नमूद करण्यात आले फोटो. दरम्यान हे रुग्ण त्याठिकाणाहून पळाले कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासंदर्भात प्रसिद्धीमाध्यमांनीही वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे काही तासातच हे तीनही रुग्ण स्वतः हुन उपचारार्थ अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.