रायगडचे दुबई रिटर्न क्रिकेटर्स पनवेल उपजिल्हा रुग्णालयात

 

 

रुग्णालय प्रशासनाने करोना तपासणीसाठी नमुने घेतले
पनवेल /प्रतिनिधी:- रायगड जिल्ह्यातून क्रिकेटच्या स्पर्धा खेळण्यासाठी स्थानिक खेळाडू दुबईला गेले होते. ते रविवारी सकाळी मुंबई ला परत आले. विमानतळावरून पनवेल महापालिकेच्या बसेस आणि रुग्णवाहिकेतून त्यांना थेट पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. येथील विलगीकरण वार्ड मधून या सर्वांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. दरम्यान या सर्वांना रिपोर्ट येईपर्यंत ग्रामविकास भवन मध्ये ठेवण्यात येणार असल्याचे समजते.
महाराष्ट्रात करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी बहुतांशी हे दुबईहून परत आलेले आहेत. यावरून दुबईमध्ये करोनाचा फैलाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या ठिकाणचा संसर्ग हा भारतात पसरल्याचे ही दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातून स्थानिक क्रिकेट खेळाडू स्पर्धा खेळण्यासाठी दुबई ला गेलेले होते. त्यापैकी काहीजण हे पनवेल येथील आहेत. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तसेच दुबईहुन परतलेल्या काहींना या रोगाची लागण झालेली आहे . या पार्श्वभूमीवर दुबईहून आलेल्या रायगड जिल्ह्यातील या खेळाडूंची तपासणी करण्यासाठी त्यांना मुंबई विमानतळावरून थेट पनवेल उपजिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी आणण्यात आले. त्याठिकाणी त्यांचे करोना तपासणीकरिता नमुने घेण्यात आले. दरम्यान आणखी काही खेळाडू परतणार असल्याचे समजते. याकरता पनवेल महानगरपालिका आणि उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली.