लोधीवलीत ‘करोना’ विरोधात स्थानिकांचा मोर्चा

 


धीरूभाई अंबानी रुग्णालयाचा गेटवर जमले ग्रामस्थ
करोना विलगीकरण कक्षाला तीव्र विरोध
पनवेल/ प्रतिनिधी:- मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत लोधीवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये करोना विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रुग्णालयात  तयारी सुरू करण्यात आली आहे. याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी रात्री रुग्णालयावर मोर्चा काढला.
पनवेलसह रायगड जिल्ह्यातील काही भाग मुंबईच्या प्रवेशद्वारावर आहे. त्याचबरोबर मुंबई पुणे या दोन महानगरात लगत पनवेल आहे. येथे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय उद्योग आहेत. या सर्व गोष्टींमुळे या परिसरात परदेश वारी करून आलेल्या नागरिकांचा वावर असतो. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने करोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली आहे. रायगड जिल्ह्यात पनवेलला त्याकरीता कक्ष उभारण्याचे काम सुरू आहे. खारघर येथील ग्राम विकास भवन मध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी दुबई येथून परत आलेल्या स्थानिक क्रिकेट खेळाडूंना ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर इंडियाबुल्स रेंटल स्कीम मधील घरे सुद्धा ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पनवेल मनपा आयुक्तांना दिले आहेत. याठिकाणी परदेशातून आलेल्या नागरिकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान येथे करोना ची लागण झालेले रुग्ण आणणार असल्याचा गैरसमज या गावातील ग्रामस्थांमध्ये झाल्याने. त्यांनी इंडियाबुल्स मध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर लोधिवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मधील दहा खोल्या करोना अतिदक्षता कक्ष स्थापन करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. त्यानुसार रुग्णालयात  तयारी सुरू केले आहे. मात्र या निर्णयाला आणि करोना अतिदक्षता कशाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. याविरोधात त्यांनी मोर्चा काढला असल्याचे समजते. गेटच्या समोर मोठ्या प्रमाणात गर्दीही केली होती. दरम्यान याकरीता पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता.