अण्णांचे मौन सुटतात आ. लंके राळेगणसिद्धीमध्ये

 


विविध विषयांवर केली यादव बाबा मंदिरात चर्चा
पारनेर /प्रतिनिधी: – दिल्ली येथील निर्भया हत्याकांडातील आरोपींना शुक्रवारी पहाटे फासावर लटकवण्यात आले. यासाठी गेल्या तीन महिन्यापासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन पाळले होते. सकाळी हे व्रत अण्णा सोडले आणि काही वेळातच पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन त्यांची भेट घेतली. दोघांनी यादव बाबा मंदिरात विविध विषयांवर चर्चा केली.
राजधानीतील निर्भया हत्याकांडातील आरोपींना जोपर्यंत फाशी होत नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मौनव्रत धारण केले होते. गेल्या तीन महिन्यापासून त्यांनी पाळलेले. दरम्यान निर्भयाच्या मारेकऱ्यांना मृत्युदंड झाल्याने हजारे यांनी समाधान व्यक्त केले. काही वेळातच पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी आ. लंके यांनी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत अण्णांशी चर्चा केली. त्याचबरोबर अर्थसंकल्पामध्ये पारनेर – नगर करिता झालेली आर्थिक तरतूद. तसेच शासनाकडे या भागातील प्रश्नांबाबत केलेला पाठपुरावा याबाबत अण्णांना माहिती देण्यात आली. याव्यतिरिक्त के. के रेंज आणि पारनेरच्या पाणीप्रश्नावर ही दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच आण्णांनी लोकायुक्त व लोकपाल विषयावर आमदार लंके यांना सविस्तर माहिती दिली.