तीस वर्षानंतर निलेश लंकेंचा पहिल्यांदा होम स्टे

 


पारनेर – नगरचे आमदारही घरात थांबले
नाना करंजुले
पारनेर /ऑनलाईन बातमी न्यूज नेटवर्क
पायाला भिंगरी लावून 24 तास 365 दिवस लोकांच्यात राहणं हा पारनेर – नगरच्या आमदारांचा दिनक्रम असतो. मात्र रविवारी जनता कर्फ्यू पालन करीत आ. निलेश लंके आपल्या घरीच थांबले. तीस वर्षानंतर दिवसभर होम स्टे करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. परंतु या महाभयंकर रोगा विरोधात लढा देण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया आ. लंके यांनी दिली.
अगदी लहानपणापासून समाज आणि राजकारणाची आवड लागलेल्या आमदार निलेश लंके यांनी कधी घरी राहणं पसंत केले नाही. लोकांच्या हाकेला धावून जाणे. आत्ता येथे दुसऱ्या मिनिटाला दुसरीकडे चौथ्या मिनिटाला तिसरीकडे अशाप्रकारे त्यांचा दिनक्रम असतो. प्रत्येकाच्या सुखदुःखात मध्ये सहभागी होणे हा त्यांचा स्वभाव. लग्न, अंत्यविधी, दशक्रिया जागरण गोंधळ, वाढदिवस या सर्व कार्यक्रमांना ते हजेरी लावणार म्हणजे लावणारच. तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी ,प्रश्न सोडवण्याकरीता या गावातून त्या गावात त्यांचा प्रवास रात्रंदिवस सुरू असतो. सर्वसामान्यांचे हित जोपासणारे हे द्रष्ट नेतृत्व महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचले आहे. आमदार झाल्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या आणखी वाढल्या. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते कमालीचे परिश्रम घेत असल्याचे दिसून येत आहे. आजारपणातही ते कधी घरी थांबले नाहीत. कायम लोकांच्यामध्ये राहणे, त्यांच्यासोबत वावरणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे. दोन-तीन तास ते फक्त झोप घेतात. तेही ज्या ठिकाणी जागा मिळेल तिथे आराम करतात. महिन्यात चार-पाच दिवस ते घरी जातात. तेही पहाटे किंवा मध्यरात्री, सकाळी जाग येते तेव्हा माणसांनी पूर्णपणे घर आणि अंगण भरलेले असते. म्हणूनच लोकांनी त्यांना लोकनेते ही उपाधी दिली आहे. रविवारी जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. कोरोना या महाभयंकर रोगाशी सामना करण्याकरिता सर्वांनी एकत्रितरीत्या प्रयत्न करणे गरजेचे असल्याने केंद्र व राज्य सरकारने राज्यातील जनतेला आवाहन केले. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी या नात्याने रविवारी आमदार निलेश लंके यांनी आपल्या हंगा येथील घरी राहणे पसंत केले. ते बाहेर पडले तर मोठी गर्दी होईल. आणि शासनाने नेमकी गर्दीत टाळण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे नाश्ता करून आ. लंके बाहेर पडले नाहीत. ते सकाळपासून घरीच बसून राहिले. फोनद्वारे त्याने शासकीय यंत्रणांकडून जनता कर्फ्यू बाबत माहिती घेतली. कायम जनतेशी संपर्कात असणाऱ्या या लोक नेत्याला घरी राहिल्याने काहीसे वेगळे वाटत होते. मात्र देश राज्य आणि लोकहिताच्या दृष्टिकोनातून घरी राहणे महत्वाचे असल्याने त्यांनी उस्फूर्तपणे जनता कर्फ्यू मध्ये सहभाग नोंदवला. मी घरी आहे. तुम्हीही घरी राहा आणि कोरोना महारोगाचा सामना करण्याकरता मदत करा असे आवाहन त्यांनी व्हिडिओ द्वारे पारनेर नगर मधील जनतेला केले.

“गेल्या तीस वर्षांमध्ये आपण कधीच घरी बसलो नाही. परंतु करोना या महाभयंकर रोगा विरोधात संघटितपणे लढण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू सर्वांनीच पाळावा. मी चहा करता आज कोणाकडेही गेलो नाही. हा कोरोना व्हायरस कमी होईपर्यंत तुम्ही कुठेही चहा घेण्यासाठी जाऊ नका. या महामारी विरोधात सरकारला सहकार्य करा”
निलेश लंके
आमदार पारनेर नगर