रस्त्यावरील पिचकारीला …. मिळाला पोलिसी खाक्या… क्षणात थुंकलेले ठिकाण झाल साफ

 


घोळका घालून थांबणाऱ्याही लाठीचा प्रसाद
नवीन पनवेल जवळील सुकापूर येथे पोलिसांची दबंगगिरी
पनवेल/ प्रतिनिधी:- एकीकडे कोरोना महामारी रोगाने आभाळाएवढे संकट ओढावले असल्याने. त्याविरोधात एकत्रित लढा सुरू आहे. आणि दुसरीकडे तंबाखू, मावा आणि गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकन अस्वच्छता निर्माण करणारे महाभाग गल्लोगल्ली फिरताना दिसतात. नवीन पनवेल लगत असलेल्या सुकापुर मध्ये अशाच काळया पिवळ्या व्हॅनचा चालक मंगळवारी रस्त्यावर थुंकला आणि हे खांदेश्वर पोलिसांच्या निदर्शनास आले. गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या चालकाला अडवले आणि त्याचे त्यांच्या पद्धतीने प्रबोधन केले. खाकीचा हिसका दाखवत त्याच्याकडून रस्त्यावर थुंकलेले ठिकाण साफ करून घेतले. त्याचबरोबर पुढे घोळक्याने जमा झालेल्यांना काहींना लाठीचा प्रसाद देत हुसकावून लावले. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. आणि त्या पोलीस कर्मचार्‍यांचे सर्वांनी अभिनंदन आणि कौतुक केले.