नवी मुंबई पोलिसांची साप्ताहिक सुट्टीही बंद

 

कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव पाहता पोलीस आयुक्तांचा निर्णय
नवी मुंबई /प्रतिनिधी: – कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी देशभरात लाॅकडाऊन करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगोदरच महाराष्ट्राच्या बाबतीत हा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या बंद करण्याचा आल्या होत्या. त्यामधून साप्ताहिक सुट्टी वगळण्यात आलेली होते. परंतु करोना विषाणूंचा वाढतात प्रादुर्भाव पाहता जास्त मनुष्यबळाची गरज लागणार आहे. त्यामुळे आयुक्त संजय कुमार यांनी पोलिसांची साप्ताहिकी सुद्धा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी मुंबई आणि पनवेल परिसरातही कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात खबरदारी घेण्यात आली आहे. इतर ठिकाणांप्रमाणेच नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सुद्धा संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात आले आहेत. तरीसुद्धा काही नागरिक घरा बाहेर पडत आहेत. जीवनाश्यक वस्तू करीता विशेषता भाजीसाठी गर्दी केली जात आहे. याव्यतिरिक्त भाजी व दूध गाड्यांमधून बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासमोर कळंबोली आणि वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई केली.
कोरोना संसर्ग टाळणे तसेच संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचे मनुष्यबळ लागणार आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी नवी मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या बंद करण्याचे आदेश आठवडाभरापूर्वी निर्गमित केले होते. 29 मार्च रोजी विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी एक आदेश सर्व प्रभारी अधिकारी आणि पोलिस ठाण्याला पाठवला आहे. त्यामध्ये 30 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचा साप्ताहिक सुट्या बंद करण्याचे सूचित करण्यात आले आहेत.

गर्भवती महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अर्जित रजेवर सोडण्याचे आदेश
पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत ज्या गर्भवती महिला अमलदार आहेत. त्यांना अर्जित रजेवर सोडण्याचे आदेश पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.