आ. निलेश लंके यांच्या कोरोना विरोधातील लढाईचे शरद पवारांकडून कौतुक  

 

अजित पवार, सुप्रिया सुळे आणि हसन मुश्रीफ यांच्याकडून फोनद्वारे शब्बासकी!
नाना करंजुले
पारनेर /प्रतिनिधी: – कोरोना या महाभयंकर रोगामुळे भल्या भल्यांची दैना उडाली आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी स्वतःला लॉक डाऊन करून घेतले आहे. मात्र पारनेर नगरचे आमदार निलेश लंके हे या महामारी विरोधात स्वतः मैदानात उतरले आहेत. आपल्या जीवाची परवा न करता हा जनतेचा आमदार पाठीवर पंप आणि हातात स्प्रे घेऊन तसेच ट्रॅक्टर वर बसून स्वतः निर्जंतुकीकरण फवारणी करीत गावोगावी फिरत आहे . याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लंके यांचे फोन द्वारे कौतुक केले.

आ. लंके यांनी गेल्या काही दिवसात कोरोना सारख्या महाभयंकर रोगा विरोधात जा पद्धतीला प्रत्यक्ष लढाई सुरू केली आहे. त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
ते स्वतः प्रत्येक गावात प्राथमिक आरोग्य केद्रांत जाऊन तिथल्या सोयीसुविधा तपासाहेत. गावात बाहेरून म्हणजे मुंबई पुणे येथून आलेल्या चाकरमानी आणि व्यवसायिकांची आकडेवारी घेत आहेत.बाहेरच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील,राज्यातील कामगार मजूर यांची राहण्याची जेवणाची सोय करून देत आहेत.
कोरोना नावाच्या विषाणू विरोधात त्यांनी एक प्रकारे युद्धात पुकारले आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस त्याचबरोबर इतर यंत्रणा आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. आपणही जनतेचा सेवक आहे. आज माझ्या मतदारसंघातील मायबाप जनता अडचणीत आहे. असे असताना मी हातावर हात देऊन बसू शकत नाही. अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी नोंदवली. ते स्वतः पुढाकार घेत असल्याने सर्व शासकीय यंत्रणा ही जोमाने काम करू लागले आहे. परिणामी आजच्या घडीला तरी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ कोरोना मुक्त आहे .
कोरोना रोगाच्या संकट समयी जनतेसाठी स्वतःच्या जीवाची परवा निलेश तू करीत नाही . तू खरा जनतेचा सेवक आहेस .
माझ्या कडून तुला खूप खूप शुभेच्छा, तुझी जनतेबद्दल असलेली आपुलकी पाहुन माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्या भावना फोन द्वारे व्यक्त केल्या.उपमुख्यमंत्री , पालकमंत्री आणि बारामतीच्या खासदार यांनी कौतुक केले.

सुप्रिया सुळे त्यांच्या मोबाईल स्टेटसवरही कौतुक
आमदार निलेश लंके हे पाठीवर पंप घेवुन जंतुनाशक फवारणी करीत आहेत.त्याचबरोबर टॅक्टरवर बसुन फवारणी करतानाचा फोटो व्हायरल झाला.हेच छायाचित्र राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर वर ठेवला आहे. आमचे आमदार निलेश लंके ट्रॅक्टर वर त्यांचा सार्थ अभिमान आहे. अशी टॅगलाईन खा. सुळे यांनी ठेवले आहे.