खांदेश्वर पोलिसांना मास्क व सॅनेटायझर वाटप

 


सभापती संजय भोपी यांचा पुढाकार
पनवेल प्रतिनिधी:- कोरोना संसर्ग टाळण्याकरता पुकारण्यात आलेला लाॅकडाऊनमुळे नवी मुंबई पोलिस अधिक व्यस्त झाले आहेत. संचार आणि जमाव बंदीची अंमलबजावणी करण्याबरोबरच गोरगरीब आणि गरजूंना अन्न व पाणी वाटपाचे काम पोलिस करीत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून ही यंत्रणा चोवीस तास काम करीत आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यातील अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी मंगळवारी मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले.विश्राम एकंबे, समुद्रा पी. पी प्रफुल उपस्थित होते.