पनवेल वाहतूक पोलीसची भूक आणि तहानेला मदत

 

बेघर, बिगारी आणि भिक्षेकरी यांना अन्न व पाणी वाटप
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांचा पुढाकार
पनवेल प्रतिनिधी: – सध्या कोरोना महामारी रोगाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लाॅकडाऊन आहे. त्यामुळे भिक्षेकरी, भिकारी कामगार, बेघर आणि झोपडपट्टी धारक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आशा गरीब आणि गरजूंची लहान भुक भागवण्यासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेने पुढाकार घेतला आहे. आशा तहान आणि भुकेल्यांना पाणी आणि अन्न वाटप वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत मोहिते तसेच इतर कर्मचारी करीत आहेत.
पनवेल परिसरात अनेक बिगारी कामगारांचा रोजगार हिरावला गेला आहे. तसेच लॉक डाऊन असल्याने मूळगावी सुद्धा जाता येत नाही. भिक्षेकरींना भिक्षा मिळत नाही. कचरावेचक महिला आणि पुरुषांनाही काम राहिलेले नाही. परिणामी या सर्वांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. यांच्याकरीता नवी मुंबई पोलीस अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यामध्ये पनवेल शहर वाहतूक शाखेचा ही समावेश आहे. त्यांच्या वतीने दररोज ठीक ठिकाणी अन्न आणि पाणी वाटप करण्यात येते. पनवेल रेल्वे स्थानक तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी पनवेल शहर वाहतूक शाखा सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचा घास भरवित आहेत.