पनवेल परिसरात पार्थ फाउंडेशन च्या वतीने जेवण

 

 


सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियोजन
पनवेल/ प्रतिनिधी: – पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने पुणे आणि अहमदनगर बरोबरच आता पनवेल परिसरात मोफत जेवण वाटप गुरुवारपासून सुरुवात करण्यात आले. लॉकडाऊन सुरू असेपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न वाटपाचे नियोजन केले जात आहे.

कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगोदर लॉक डाऊन केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बंद’ची घोषणा केली. त्यानुसार सध्या लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार फाउंडेशनच्यावतीने मोफत जेवण वाटप कार्यक्रम सुरू केला. सुरुवातीला पुणे जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला मोफत जेवण वाटप उपक्रम सर्वसामान्य करता फायदेशीर ठरत असल्याचे पाहून अहमदनगर मध्ये मोफत जेवण देण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान पनवेल परिसरातही गुरुवारपासून पार्थ पवार फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याकामी सरसावला आहे. गुरुवारी पनवेल, नवीन पनवेल, कामोठे खारघर तसेच ग्रामीण भागात जवळपास दीड हजार गरीब गरजूंना मोफत अन्न देण्यात आले . कळंबोली येथील शामल मोहन पाटील शैक्षणिक संकुलात मध्यवर्ती किचन सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणाहून पनवेल परिसरात अन्न वितरित केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत, युवा नेते तुषार पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव संदीप म्हात्रे, युवा जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल, सुनील नाईकपनवेल विधानसभा युवा अध्यक्ष सुनील ढेंबरे , युवा कार्याध्यक्ष मंगेश नेरुळकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.