माथाडी कामगारांना भाजपकडून मदतीचा हात

 

जीवनावश्यक वस्तू देऊन दिला लॉकडाऊन मध्ये आधार
पनवेल/ प्रतिनिधी: – अगोदरच मेटाकुटीला आलेल्या माथाडी कामगारांचे लॉकडाऊन मध्ये उरलेसुरले कामसुद्धा बंद झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार भाजप कळंबोली मंडलच्या वतीने स्टील मार्केटमध्ये माथाडी कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात का होईना आधार मिळाला.
माथाडी कामगारांना भाजपकडून मदतीचा हात
जीवनावश्यक वस्तू देऊन दिला लॉकडाऊन मध्ये आधार
पनवेल/ प्रतिनिधी: – अगोदरच मेटाकुटीला आलेल्या माथाडी कामगारांचे लॉकडाऊन मध्ये उरलेसुरले कामसुद्धा बंद झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार भाजप कळंबोली मंडलच्या वतीने स्टील मार्केटमध्ये माथाडी कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात का होईना आधार मिळाला
कळंबोली राहणारे माथाडी कामगार स्टील मार्केट मध्ये काम करतात. याठिकाणी सुरुवातीला या कामगारांच्या हाताला काम मिळत होते. दरम्यान काही स्टील यार्ड मालकाने भाडेतत्त्वावर इतरांना दिले आहेत. त्यांनी इतर वस्तू त्या ठिकाणी ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच क्रेन आणी इतर यांत्रिक बदलांमुळे पूर्वीप्रमाणे कामगारांना काम मिळत नाही. त्यामुळे मिळेल त्या कामात आणि त्या मोबदल्यात ते हे कामगार आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग होऊ नये याकरीता लॉकडाऊन सुरू आहे. परिणाम कळंबोलीतील लोखंड मार्केटही बंद आहे. त्यामुळे माथाडी कामगारांना काम मिळत नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी पैसेही त्यांच्याकडे नाहीत. काही कुटुंबातील इतर जण कामाला नसल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरीब आणि गरजू ओझे उचलणाऱ्या माथाडी कामगारांच्या मदतीला भारतीय जनता पक्ष कळंबोली मंडल धावून गेले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार या कामगारांना कांदे, बटाटे, तांदूळ, तेल, साखर अशा वस्तू देण्यात आल्या. टाटा व इस्पात स्टील यार्डमध्ये जुनी आणि नव्या टोळीला या जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या. यावेळी भाजपचे कळंबोली मंडळ अध्यक्ष रवीनाथ पाटील, महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, नगरसेवक राजेंद्र शर्मा , पक्षाचे कळंबोली सरचिटणीस तथा स्थानिक माथाडी नेते राजेंद्र बनकर, अशोक मोटे, सरचिटणीस प्रशांत रणवरे उपस्थित होते. सोशल डिस्टन्स ने माथाडी कामगारांना या वस्तू वाटप करण्यात आल्या. कामगारांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. व कळंबोली भाजपाचे आभार मानले. दरम्यान यासाठी नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर आणि राजेंद्र बनकर यांनी पुढाकार घेतला. माथाडी कामगारांची व्यथा त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मांडली होती. लगेचच  कामगारांना भाजप कडून मदत करण्यात आली.