सोल्वे ग्रुपकडून अठराशे लिटर हॅन्ड वाॅश

 


जिल्हाधिकाऱ्यांकडे केले सुपूर्द
अलिबाग, (जिमाका)- सोल्वे ग्रुप रोहा यांच्याकडून सोमवारी5 लिटर च्या 360 बॉटल्स याप्रमाणे एकूण 1 हजार 800 लिटर हँड वॉश सामाजिक बांधिलकीतून देण्यात आले. जिल्हाधिकार्यालय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले. अशाप्रकारे सामाजिक बांधिलकीतून कोरोना विरोधात लढण्यासाठी मदतीचा हात देण्याचा वस्तुपाठ या ग्रुपने इतरांसमोर ठेवला आहे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद गवई, सोल्वे कंपनीचे सिस्टीम सपोर्ट मॅनेजर अनिल तस्ते, आरोग्य, सुरक्षा व पर्यावरण व्यवस्थापक सतिश कुलकर्णी उपस्थित होते.
साेल्वे कंपनीने केलेल्या या सहकार्याबद्दल निधी चौधरी यांनी प्रशासनातर्फे त्यांचे आभार मानले.