एकाच गावात एका पासून 48 जणांना कोरोना

 


उरण हादरले: करंजा गावात आणखी 27 जणांना संसर्ग
पनवेल/ प्रतिनिधी: – उरण तालुक्यात करंजा याठिकाणी एका मच्छीमार बांधवा पासून जवळपास 48 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबद्दल एकवीस आणि आता 27 जणांना लागण झाली आहे. त्यामुळे उरण पूर्णपणे हादरून गेले आहे. अशाप्रकारे समूह संसर्ग होण्याचा रायगडमध्ये पहिलाच प्रकार आहे. नागरिकांनी शासन आणि प्रशासनाकडून ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. सोशल डिस्टन्स ठेवावा असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शनिवारी एकाच दिवशी चार कुटुंबातील 21 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. यामध्ये 12 स्त्री आणि 9 पुरुष रुग्णांचा समावेश होता. तसेच एक वर्षाच्या लहान मुलीसह 6 मुलांनाही लागण झाली होती. या रुग्णांच्या संपर्कात तब्बल 67 जण आले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील हाय रिस्क कॉन्टॅक्ट असलेल्या 33 जणांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. त्यापैकी 27 जणांची कोविड 19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तर उर्वरित 6 जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. आत्तापर्यंत
उरण तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 56 पोचली आहे . त्यापैकी 5 बाधित रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत.