कोरोनाने हद्दच केली: पनवेल मनपा हद्दीत नव्याने दोन डझन रुग्ण

 


खांदा वसाहतीत मृताच्या कुटुंबातील आठ जणांना लागण
मुंबई दलातील दोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश
बेस्ट कर्मचारीही मोठ्या प्रमाणात कोविडचे शिकार
पनवेल/ प्रतिनिधी: रविवारी पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाने हद्द ओलांडली. तब्बल दोन डझन रुग्ण चोवीस तासात सापडले. त्यामध्ये खांदा वसाहतीत कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील आठ जणांना लागण झाली. त्याचबरोबर पनवेल परिसरात राहणाऱ्या आणि मुंबई दलात कर्तव्यावर असलेले दोन पोलीस अधिकारी तसेच दोन कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे बेस्ट कर्मचारी कोरोना संसर्गाचे शिकार होत असल्याचे दिसून येत आहे.

कामोठे , सेक्टर – ३५ . संकला सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४५ वर्षीय व ११ वर्षीय अशा २ महिला कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . सदरपेकी एक महिला मुंबई महानगरपालिका येथे लिपिक म्हणून कार्यरत आहे . त्या महिलेला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाला असून तिच्या मुलीला तिच्यापासूनच संसर्ग झाल्याचा अंलिम निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर – ११ . आशियाना कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील २७ वर्षीय व २५ वर्षीय अशा २ व्यक्तींना कोरानाची लागण झाली आहे . सदर कुटुंबाचा कुटुंब प्रमुख याआधी कोविड- १९ पॉझिटिक आलेला होता . त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . खांदाकॉलनी , सेक्टर – ७ , श्रीजी संघ सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्तींना लागण झालेली आहे. या कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचा कोवीडमुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा भाऊ खांदा कॉलनी , सेक्टर – ७ , सागरदीप सोसायटी येथे राहतो. त्यांच्या कुटुंबातील ४ व्यक्ती कोविड – १९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . त्यांच्यापासूनच या चौघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कळंबोली , सेक्टर – ३ई . केएल . ५ येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ज आलेल्या आहेत . सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख मुंबई येथे बेस्ट कंडक्टर असून ते याआधीच कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेले आहेत . त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर – १६ , वास्तुविहार सोसायटी येथील १व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव आलेली आहे . ही व्यक्ती गोवंडी डेपा येथे बेस्ट कन्डक्टर म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर – ११ , फ्रेंड सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव आलेल्या आहेत . सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख चेंबूर येथे PSI म्हणून कार्यरत असून याआधीच कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेले आहेत , त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर – ५ , मारूती टॉवर येथील १ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिक आलेली आहे . ही व्यक्ती नागपाडा पोलिस स्टेशन , मुंबई येथे पोलिस कॉन्सटेबल म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . रोडपाली , सेक्टर – १० , कुबेर पॅलेस येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख चेंबूर येथे PSI म्हणून कार्यरत असून याआधीच कोकिड – १९ पॉझिटिव्ह आलेले आहेत . त्यांच्यापासूनच या चौघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कळंबोली , सेक्टर – ३ई , केएल – ५ येथील ३३ वर्षीय १ महिला कोकिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिलेच्या शेजारच्या घरातील एक व्यक्ती गोवंडी बस डेपो येथे कंडक्टर म्हणून कार्यरत असून याअगोदरच ले कोदिड – १९ कोकिड १९ पॉझिटिव्ह आलेले आहेत , त्यांच्यापासूनच सदर महिलेला संसर्ग झाल्याचा प्रार्थामक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर – १७ , रिब्दी सिध्दी दर्शन येथील ३६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती शिवाजी नगर पोलिस ठाणे , गोवंडी येथे पोलिस दलात कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे .

9 रुग्ण बरे झाले
पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील पाच आणि खारघर व नवीन पनवेल मधील प्रत्येकी दोन असे एकूण नऊ रुग्ण कोरणा मुक्त झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे.