पिगी बँकेतील पैसे महापौर सहाय्यता निधीत

 


नऊ वर्षांच्या आदित्यने साजरा केला सामाजिक बांधिलकीचा वाढदिवस
पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांचा धाकटा मुलगा आदित्य याचा नववा वाढदिवस होता. कोरोनाच्या पार्श्वभूमी यंदा बर्थडे सेलिब्रेशन ठाकूर कुटुंबीयांनी केले नाही. आणि बर्थडे बॉयने सुद्धा त्यासाठी कोणताही बाल हट्ट धरला नाही . इतकेच नाही तर वर्षभर खाऊसाठी मिळाले पैसे आदित्यने बचत केले. ही रक्कम आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधून कोविड विरोधात लढा देण्यासाठी महापौर सहाय्यता निधी स्वयंस्फूर्तीने जमा करण्याचा निर्णय घेतला. अगदी लहान वयातच बचत, सामाजिक बांधिलकी जाणीव आणि संवेदनशीलता या संस्काराचे दर्शन आदित्यने दाखवत आपल्या कुटुंबाच्या सामाजिक परंपरेचा वारसा पुढे नेण्याचे जणू काय समाजाला एक प्रकारे आश्वास्त केले

कोरोना या महामारी रोगा विरोधात मोठी लढाई गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या साथीच्या आजाराला रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिका आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर सहाय्यता निधी ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये सामाजिक संस्था, उद्योजक त्याचबरोबर दानशूर व्यक्ती निधी देत आहेत. त्या माध्यमातून वेगवेगळ्या किटस्, वैद्यकीय साहित्य, खरेदी केले जाता आहे. तसेच लॉक डाऊन मध्ये अडकलेल्यांना अन्नछत्र चालवले जात आहे. महापौर सहाय्यता निधीला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पनवेलला या संकटातून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून आपले काका आमदार प्रशांत ठाकूर, वडील सभागृह नेते परेश ठाकूर हे लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असल्याचे आदित्य जवळून पाहत आहे. या लढ्यात आपणही फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी असे या शाळकरी मुलाला मनोमन वाटले. त्याने आपल्या स्वत:च्या पिगी बँकमध्ये जमा झालेले दोन हजार चारशे सत्तर रुपये पनवेल महापालिकेच्या महापौर निधीत जमा केले. तेही स्वयंस्फूर्तीने, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून. या लहानग्या ने दररोज जमा करून ठेवलेला संचय एका मोठ्या कामाकरीता देऊन समाजातील अनेकांसमोर एक वस्तू ठेवला. आदित्यच्या या सामाजिक बांधिलकीचे खऱ्या अर्थाने कौतुक होत आहे.